अपघाताची ही घटना एक जानेवारी रोजी मध्यरात्रीनंतर परळी तालुक्यातील दाऊतपूर येथील राख तळ्यात घडली. एमएलसी जबाब उशिरा आल्याने अपघातानंतर २१ दिवसांनंतर म्हणजे २२ रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात एमएच ४४.१७१८ या क्रमांकाच्या टिप्पर चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास परळी ग्रामीण पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक केकान हे करीत आहेत. जखमी राजेंद्र मुंडे यांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आहे. टोकवाडी येथे राजेंद्र मुंडे यांची वीटभट्टी असून, ते ही राख भरण्यासाठी टिप्परमध्ये बसले होते. टिप्परमधून खाली उतरले असता पाठीमागून दुसऱ्या टिप्परने त्यांना धडक दिली. त्यात त्यांच्या पोटाला मार लागला. आता त्यांची तब्बेत उत्तम असल्याचे सांगण्यात आले.
दाऊतपूर येथील राख तळ्यात टिप्पर धडकेने वीटभट्टी चालक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 4:15 AM