सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहरातील बिंदूसरा नदीवरील ब्रिटीशकालीन पूल पाडून नवीन पुलाचे काम तातडीने सुरु होणार असून हा पूल पावसाळ्यापूर्वी वाहतुकीस खुला करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. उंची न वाढवता हा पूल बनविण्याचा प्रयत्न असून, त्यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांच्या मालमत्तांना बाधा पोहोचणार नाही.
शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे क्षेत्रीय अधिकारी एम. चंद्रशेखर आणि प्रकल्प संचालक अजय गाडेकर, प्रबंधक महेश पाटील यांनी बायपासची पाहणी करून भूसंपादन आणि मावेजाच्या संदर्भातील तक्रारींचा आढावा घेतला. तसेच बायपासला शिदोड, पिंपळनेर रस्ता पॉर्इंटजवळ करावयाच्या स्लीपरोडची पाहणी या अधिकाºयांनी केली.
यावेळी आ. विनायक मेटे, बीडचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पुलास भेट देऊन पुलाच्या बांधकामासंदर्भात संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी जलसंधारण खात्याचे कार्यकारी अभियंता वसंत गालफाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर आदी उपस्थित होते. गुरुवारी आ. जयदत्त क्षीरसागर यांनी एस.चंद्रशेखर, आय.आर.बी.चे वरिष्ठ अधिकारी आणि इतर अधिका-यांची तातडीने नागपूर येथे बैठक घेतली होती. आय.आर.बी. करत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग २११ च्या कामांतर्गत स्कोप आॅफ चेंज वर्क या हेडखाली हे या पुलाचे काम होणार आहे.राष्ट्रीय महामार्ग : उद्घाटन आणि शुभारंभराज्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या उद्घाटनांचा एक व्यापक कार्यक्रम जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. ज्या राष्टÑीय महामार्गाचे काम झाले असेल त्याचे उद्घाटन आणि नियोजित कामांचा शुभारंभ असा हा कार्यक्रम आहे.केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, मंत्री, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे आता जी पुलाची उंची आहे ती आणखी वाढवावी लागणार आहे. उंची वाढवल्यास अनेक मालमत्तांना बाधा पोहोचणार आहे. रस्त्यासाठी ह्या मालमत्ता संपादित कराव्या लागतील. यासाठी बराच अवधी लागेल. शिवाय मावेजा देण्यासाठी पैशाचाही प्रश्न निर्माण होईल. हे टाळण्यासाठी पुलाची उंची आहे तेवढीच ठेवावी लागेल.बिंदुसरा नदीला आतापर्यत किती वेळा पूर आले, पुराच्या पाण्याची पातळी किती वाढली होती, याचाही आढावा घेतला असता १९८९ साली झालेल्या अतिवृष्टीत पुराचे पाणी या पुलावरून वाहून गेले होते. त्यानंतर मात्र २८ वर्षात अशी परिस्थिती ओढवली नाही.
जलसंधारण विभागकडून घेणार मार्गदर्शनपूल आणि बंधारा असा दुहेरी उपयोगाचा पूल बनविण्याची मागणी होती. परंतु, आता पूल आणि बंधारा स्वतंत्र राहणार आहे. बंधारा पुलाजवळ कुठे घ्यायचा आणि त्याची उंची किती ठेवायची यासंदर्भात जलसंधारण विभागाकडून मार्गदर्शन घेण्यात येणार आहे. या बंधाºयाची उंची दोन मीटरपर्यंत असेल, अशी माहिती आहे.