शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

बहिणीसमोरच भावाचा मृत्यू; भीषण अपघातात नवशिक्या कार चालकासह बाईकस्वार जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2021 11:08 AM

नवशिक्या कार चालकाने बाईकला उडवल्यानंतर चालकासह बाईकस्वाराचा मृत्यू, बाईकवरील दोघे जखमी झाले आहेत.

केज (बीड ) : केज तालुक्यातील साळेगाव येथे कळंब रस्त्यावर सकाळी सहा वाजेदरम्यान एका नवशिक्या कार चालकाने बाईकला उडवले. यात कार चालक अमित बाराते आणि बाईकस्वार अमोल सत्वधर यांचा जागीच मृत्यू झाला. तर बाईकवरील एक महिला व मुलगा हे दोघे जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भयंकर होता की, कार प्रथम पुलाच्या कठड्याला धडकून मोटार सायकलला धडकली असावी. त्यानंतर ती कार अनेक वेळा पलटी खाल्ल्याने चकनाचूर झाल्याचे दिसत आहे.

दिवाळी-भाऊबीजेला अमित सत्वधर याची बहीण माहेरी आली होती. बस बंद असल्याने आज सकाळी सहा वाजे दरम्यान अमोल बहिणीला आणि भाच्याला तिच्या सासरी सोडण्यासाठी बाईकवरून घेऊन जात होता. याच दरम्यान केज-कळंब रोडवर साळेगाव येथे शाम तेलंग यांच्या शेताजवळच्या पुलावर  एका भरधाव कारने (एम एच २५/एएस ७५९० )ने अमोलच्या बाईकला (एम एच ४४/वाय२१५३) धडक समोरून जोरदार धडक दिली. यानंतर कार पुढे जाऊन उलटली. या भीषण अपघातात अमोल सत्वधर आणि कार चालवीत असलेला युवक अमित जीवन बाराते (२२ वर्ष रा. कळंब ) हे दोघे जागीच ठार झाले. तर बाईकवरील अनुराधा विनोद फुलसुंदर आणि त्यांचा लहान मुलगा आदित्य हे दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, संतोष मिसळे, पाचपिंडे, गवळी, गायकवाड, शिनगारे, सानप, शेख, गित्ते, हनुमंत गायकवाड हे सर्व पोलीस कर्मचारी हजर झाले व रुग्णवाहिका चालक घुले व ग्रामस्थ यांनी मदत केली.

बहिणीला सासरी सोडण्यासाठी जात होतादिवाळीच्या भाऊबिजेला माहेरी केज येथे आलेल्या बहिणीला तिच्या सासरी सोडण्यासाठी एसटीचा संप असल्याने अमोल बाईकवरून बार्शी तालुक्यात सासरी सोडण्यासाठी जात होता. त्यात गाडी चालविण्यास शिकत असलेल्या नवख्या चालकाने त्यांना धडक दिली. यात बहिणीसमोरच भावाचा जागीच मृत्यू झाला. तर ज्या गाडीने त्यांना धडक दिली ती गाडी कळंब येथील बाराते यांची असून आठ दिवसांपूर्वीच त्यांनी गाडी खरेदी केलेली आहे. अमित बाराते हा त्याच्या दोन मित्रांना सोबत घेऊन गाडी शिकत होता. कारवरील नियंत्रण सुटल्याने तो स्वतः मयत झाला सोबत बाईकस्वार अमोल सत्वधर याचाही जीव गेला.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू