धारुर : तालुक्यातील मोहखेड शिवारात धारुर व माजलगाव तालुक्यातून चोरी केलेल्या चोरट्यांची दबा धरुन बसल्याची माहिती मिळताच मोहखेड ग्रामस्थांनी धरपकड करत चोरट्यांना सिरसाळा पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना शनिवारी घडली.माजलगाव व धारुर तालुक्यातील काही गावात १५ दिवसांत जनावरे व घरफोडीच्या घटना घडल्या आहेत. चोरी केलेली जनावरे व घरफोडीतील साहित्यासह चोरटे मोहखेड शिवारात डोंगरावरील एका आखाड्यात दबा धरुन बसल्याची माहिती मिळाली. त्यावरुन मोहखेड ग्रामस्थांनी टाकलेल्या छाप्यात चोरी केलेली साहित्य, रस्सी, दगड, गज आदी वस्तू आढळून आल्या. तेथे उपस्थित परराज्यातील चार चोरांना पकडून ग्रामपंचायत कार्यालयात डांबले होते.सदर घटनेची माहिती सिरसाळा पोलिसांना समजताच मोहखेड येथे दाखल होत चोरट्यांना ग्रामस्थांच्या तावडीतून ताब्यात घेतले. पंधरा ते वीस चोरांची ही टोळी आहे. गेल्या काही दिवसांत तेलगांव, दिंद्रूड, कांदेवाडी, मोहखेड येथे घडलेल्या चोरीच्या घटनेत या टोळीचा हात असल्याची चोरट्यांनी कबुली दिली आहे.दरम्यान सिरसाळा ठाण्यात पकडलेले संशयित मोहम्मद जुनैद शेख इमामोद्दिन, सलीम खान, शेख ताहीर रोशन, नेहाज अलवि मोहम्मदीन या चौघांना अटक केले आहे. पुढील तपास सिरसाळा पोलीस ठाण्याचे सपोनि डोंगरे यांच्यासह पो.हे.कॉ. लांडगे व पवार करीत आहेत.
मोहखेड शिवारात घरफोडी करणारे चोरटे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:19 AM
तालुक्यातील मोहखेड शिवारात धारुर व माजलगाव तालुक्यातून चोरी केलेल्या चोरट्यांची दबा धरुन बसल्याची माहिती मिळताच मोहखेड ग्रामस्थांनी धरपकड करत चोरट्यांना सिरसाळा पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना शनिवारी घडली.
ठळक मुद्देग्रामस्थांची सतर्कता : मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश