कृष्णांत जनार्दन कुंभार (३६, रा. बेलवडे हवेली, ता. कराड जि. सोलापूर) असे त्या वाहकाचे नाव आहे. वाहकाच्या परवान्याची मुदत संपल्याने ते मित्रांसोबत २१ रोजी नामलगाव फाटा येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात आले होते. कार्यालयीन कामकाजास विलंब असल्याने कार (एमएच १४ - एचके ६७९७) नामलगाव फाट्यावरील पुलाखाली उभी करून त्यांनी त्यात आराम केला. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास अचानक कारमधून (एमएच ०१ - एएम४०८५) चौघे आले. त्यांनी कारची काच वाजवली. कुंभार यांनी दरवाजा उघडताच त्यांना मारहाण केली गेली. गळ्यातील चेन व अंगठी असा ६० हजार रुपयांचा ऐवज घेऊन त्यांनी पोबारा केला. या प्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक निरीक्षक योगेश उबाळे तपास करीत आहेत.
... व्हिडिओवरून आरोपींचा छडा
मारहाण होत असताना तेथे उपस्थित एका तरुणाने व्हिडिओ काढला. त्यावरून आरोपींची ओळख पटविण्यात आली. मात्र, वाहक कृष्णांत कुंभार यांनी २२ रोजी घटनास्थळावर चेन व अंगठी मिळून आल्याचा दावा केला. शिवाय हल्लेखाेरांच्या कारला कोणी तरी कट मारला होता, गैरसमजुतीतून त्यांनी मारहाण केली, असा खुलासा पोलिसांकडे केला.