तालुक्यातील अनेक गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी आष्टी शहरांमध्ये येत असतात. सध्या कोरोना नियमाच्या अधीन राहून शासनाने पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याने विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात येत आहेत, परंतु ग्रामीण भागातील बससेवा पूर्णपणे ठप्प असल्याने, विद्यार्थ्यांना महाविद्यालय व शाळेमध्ये येण्यास उशीर होत असल्याचे दिसून येताच, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाने ग्रामीण भागातील बससेवा सुरू करून शालेय विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवाव्यात, अशी मागणी आगार व्यवस्थापक संतोष डोके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. ग्रामीण भागातील बससेवा सुरू केली असून, तीन बसच्या फेऱ्या सुरू केल्या असून, पाटसरा, सावरगाव (मायंबा), चिंचोली (गहिनीनाथ गड) या गावात मुक्कामी बस फेऱ्या सुरुवात करण्यात आली असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह, नागरिकांना शहराकडे ये-जा करण्यासाठी होणारी अडचण दूर झाली आहे.
आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागात बससेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 4:36 AM