केज : अहमदपूर-जामखेड राष्ट्रीय महामार्गावर चंदनसावरगाव शिवारात मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-मुखेड बसवर कोंबड्याची वाहतुक करणारा भरधाव टेम्पो धडकला. या भीषण अपघातात बसमधील तीन प्रवासी ठार झाले. तर १२ प्रवासी जखमी झाले आहेत.
मंगळवारी दुपारी एकवाजण्याच्या दरम्यान औरंगाबाद मुखेड ही बस केज स्थानकातुन ३७ प्रवाशांना घेऊन बाहेर पडली. दरम्यान चंदनसावरगाव शिवारात अंबाजोगाईकडून केजकडे भरधाव वेगाने येणाऱ्या एका टेम्पोने बसला उजव्या बाजूने जोराची धडक यामुळे बसचा पत्रा कापला गेला. यात जाऊन विजयालक्ष्मी बाळासाहेब देशमुख ( 60 वर्षे, रा मोहखेड ता.मुखेड) ,अनिल मोतीलाल कवलकर ( 40 वर्षे रा.उमरगा ) आणि एक अनोळखी प्रवासी अशा तिघांचा मृत्यू झाला.
अपघातात जखमींची नावे अशीबालाजी मारोती घाडगे 50 वर्षे, रा.जांबमुखेड, दत्ता रघुनाथ मोरे,वय 35वर्षे, रा.लातूर, विकास दास, वय 40 वर्षे,रा. कलकत्ता, डॉ विष्णुकांत गायकवाड, वय 30 वर्षे,रा.हाळी हरंगुळ,डॉ संतोष ज्ञानोबा गुणाले,वय 30वर्षे,रा. उदगीर, शितल सुनील मायकर,वय 25 वर्षे,अशोक बबन जाधव,वय 40 वर्षे,रा.खडकवडे,अल्फिय अझर सिद्दीकी, वय 21 वर्षे,रा.अंबाजोगाई, व इतर चार जखमी मिळून एकुण 12 ,जखमी झाले आहेत. जखमींवर स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी रक्त, मांसाचे तुकडेअपघाताची माहिती मिळताच युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी कर्मचा-यांसह घटनास्थळी धाव घेतली. या वेळी अपघातस्थळी रक्त आणि मांसाचे तुकडे पडल्याचे विदारक चित्र होते.