शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वाहने अडवून लुटणाऱ्या टोळीचा अंबाजोगाईत पर्दाफाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 11:22 PM

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : रस्त्यात वाहने अडवून लुटमार करण्याच्या घटना केज, युसूफ वडगाव, सिरसाळा, अंबाजोगाई हद्दीत मागील काही महिन्यात घडल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या विशेष पथकाला या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. दोन लुटारूंना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या टोळीत आणखी किती लोक आहेत, याचा शोध घेतला ...

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : रस्त्यात वाहने अडवून लुटमार करण्याच्या घटना केज, युसूफ वडगाव, सिरसाळा, अंबाजोगाई हद्दीत मागील काही महिन्यात घडल्या होत्या. अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या विशेष पथकाला या टोळीचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. दोन लुटारूंना बेड्या ठोकल्या असून त्यांच्या टोळीत आणखी किती लोक आहेत, याचा शोध घेतला जात आहे.

२६ मार्च रोजी केज येथील ट्रॅव्हल्स एजंट शेख अमजद शेख अहमद हे धारूरहून केजकडे जात असताना तांबवा पाटीजवळ त्यांच्या कारला दुचाकी आडवी लावून अनोळखी चौघांनी त्यांच्याच गाडीतून अपहरण केले आणि आधी पाच लाख आणि नंतर तडजोडीत एक लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी पोलिसांच्या सतर्कतेमुळे शेख मजद यांचा जीव वाचला होता. मात्र अपहरणकर्ते पळून जाण्यात यशस्वी ठरले होते.

त्यानंतर ३ एप्रिल रोजी अतुल सुंदरराव देशमुख यांना केजहून बोरी सावरगावकडे जाताना तिघांनी रस्त्यात धक्का देऊन पाडले होते आणि रोख ६ हजार, मोबाईल आणि गाडी घेऊन पसार झाले होते. ६ एप्रिल रोजी नवनाथ त्रिभुवन हे कावळ्याची वाडी फाटा येथे थांबले असताना तिघांनी त्यांना सिरसाळा येथे सोडण्याच्या बहाण्याने रेवली शिवारात नेऊन चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील दोन मोबाईल आणि एटीएम कार्ड काढून घेतले. नंतर त्यांनी एटीएम मधून ९,५०० रुपये काढून घेतले. तसेच सिरसाळा येथे अशाच पद्धतीने लुटमारीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला होता तर तर अंबाजोगाई येथून दुचाकी चोरीची घटना घडली होती. सततच्या लुटमारीच्या घटनांची अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी गांभीर्याने दखल घेतली आणि गुन्ह्यांच्या शोधासाठी एक विशेष पथक नेमले.

या पथकाने सापळा रचून अमोल अशोक मुंडे (रा. कोयाळ, ता. धारूर) यास अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथून तर लक्ष्मण बालाजी कराड (रा. चोपनवाडी) यास अंबाजोगाई शहरातून ताब्यात घेतले. या दोघांनी अन्य इतर साथीदारांसोबत मिळून सदरील गुन्हे केल्याची कबुली दिली असून तपासात त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून चोरीची दुचाकी, मोबाईल आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, सहा. पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकातील पोलीस कर्मचारी भास्कर केंद्रे, सानप, नागरगोजे आणि पवार यांनी केली.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाThiefचोरPoliceपोलिस