पावसाचे तुषार सिंचन
शिरूर कासार : तालुक्यात एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाचे दोन दिवसांपासून आगमन सुरू असून कोमेजलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. असे असले तरी पावसाने तुषार सिंचनपद्धती अवलंबिली असल्याचे चित्र दिसत आहे. मोठ्या पावसाशिवाय पाणीप्रश्न मिटणार नाही, ही चिंता अजूनही कायम आहे. तूर्त दिलासा असला तरी शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत.
जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनी शिष्यवृत्तीपात्र
शिरूर कासार : येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या दोन विद्यार्थिनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत. पात्र ठरलेल्या वैष्णवी गायके आणि वैष्णवी पवार यांना आता शिष्यवृत्ती मिळणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवल्याबद्दल मुख्याध्यापक अंकुश शिंदे सह मार्गदर्शक शिक्षकांनी दोघींचे कौतुक केले आहे .
भिजपावसामुळे रस्ते झाले चिखलमय
शिरूर कासार : दोन दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी तो जोराचा नसल्याने पाणी वाहून जात नसल्याने तसेच जागोजागी खोदले गेल्यामुळे रस्ते चिखल होऊन चिखलमय झाले आहेत. नाल्यातून पाणी वाहिले नसल्याने नाल्यातच डबके साचले असल्याचेही दिसून येत आहे.
वाहनचालकांची कसरत
शिरूर कासार : जवळपास वर्षभरापासून बीड-चिंचपूर या मुख्य रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. जागोजागी खोदून ठेवलेला असल्याने पावसादरम्यान वाहन चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. त्यातच छोटे वाहन अथवा दुचाकीचालकांना या झालेल्या चिखलामुळे व पडलेल्या खड्ड्यांमुळे मोठ्या त्रासाला व धोक्याला सामोरे जावे लागत आहे.
190821\img20210818162146.jpg
भगर चोळणीचे काम वेगात सुरू असल्याचे चित्र