: शहरअंतर्गत कानडी रोड वर पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत ,उमरी रस्त्याचे दोन किमी अंतराचे डांबरीकरण करण्यात या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीने मंगळवारी कानडी रस्त्यावर एक तास आंदोलन केले.
केज शहर अंतर्गत मेन रोड ते क्रांतीनगर स्मशानभूमीपर्यंत पडलेले खड्डे तात्काळ बुजावेत व उमरी रस्त्याचे दोन किमी अंतर मजबुतीकरण व डांबरीकरण तात्काळ कारावे या मागणीसाठी केज विकास संघर्ष समितीने रस्त्यावर उतरत मंगळवारी प्रा. हनुमंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक तास आंदोलन केले. या आंदोलनाची प्रशासनाने तातडीने दखल घेतली. कानडी रस्त्यावरील खड्डे पुढील सात दिवसात पर्यंत पूर्णतः भरण्याचे व उमरी रस्त्याचे दोन किलो मीटर अंतरापर्यंतचे डांबरीकरण व मजबुतीकरणाचा प्रस्ताव पाठवून गतीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनांमुळे कानडी रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. या आंदोलनात केज विकास संघर्ष समितीचे नासेर मुंडे ,महेश जाजू आदी सह समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते