शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

कर्नाटकी दगडाला महाराष्ट्रात देवपण; शेकडो मूर्ती घडवणारे चार हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 6:35 AM

दोन भावंडांनी घडविल्या शेकडो मूर्ती; लाखो भक्तांचा टेकतो माथा

नितीन कांबळे लोकमत न्यूज नेटवर्क  कडा (जि. बीड) : टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही, असे म्हणतात. त्याचीच प्रचिती देत आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील दोन मूर्तिकार भावांनी कर्नाटकातून आणलेल्या दगडाला देवपण दिले आहे. त्यांच्या या मूर्तींनी राज्यभर ख्याती मिळवली आहे.      

बाळासाहेब पंडित व भीमराव पंडित ही या मूर्तिकार भावंडाची नावे... दगड घडवून त्यावर कोरीव काम करून प्रपंच चालवायचा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. वडील कृष्णराव पंडित हे निरक्षर. परंतु, त्यांनी लेकरांना अक्षर ओळख येईल इतपत शिक्षण दिले. लेकरं हाताखाली येताच पाटी पेन्सिलऐवजी हाती छन्नी, हातोडा दिला. वडिलांच्या निधनानंतर सर्व जबाबदारी दोन भावांच्या खांद्यावर पडली. दिवसरात्र छन्नी, हातोड्याच्या माध्यमातून देवाच्या घडीव मूर्ती बनवणे सुरू झाले. आता त्यांच्या व्यवसायाला तीस वर्षे झाली आहेत.  बदलत्या काळानुसार मागणी वाढली. चांगल्या दगडांची मागणी होऊ लागली. मग जवळपासचा नव्हे तर कर्नाटकातून दगड आणला जाऊ लागला. त्याला छन्नी, हातोडा, कटरच्या साह्याने कापून जशी मागणी येईल त्या देवाची मनमोहक मूर्ती बनवली जाते. या घडीव व कोरीव मूर्तीला राज्यभर चांगली मागणी आहे. 

दीड फुटापासून सात फुटांपर्यंत मूर्ती बनवली जाते. यासाठी २० हजार ते १ लाखांपर्यंत खर्च येतो. - भीमराव पंडित, मूर्तिकार  

नवे तंत्रज्ञान अवगत झाले असले तरी दगडी व घडीव मूर्तीला मागणी कायम आहे. दगडाला देवपण देताना मनातदेखील चांगली भावना निर्माण होते. - बाळासाहेब पंडित, मूर्तिकार    

टॅग्स :Karnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्र