याप्रकरणी शेतकऱ्यांना कापसाच्या पैशांसाठी जिनिंग चालकाकडे खेटे मारावे लागत होते. यावर आरे बंधू शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. शेतकऱ्यांना खोटे चेक व बेकायदेशीर बनावट कागदपत्रे तयार करून दिली. कागदपत्रे खोटी आहेत, याची माहिती असतानादेखील खरे आहेत, असे भासवून शेतकऱ्यांकडून आर्थिक लाभ घेण्याच्या उद्देशाने त्यांचा कापूस खरेदी केला. आरोपींनी शेतकऱ्यांची ७८ लाख ५२ हजार ५१३ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. दिशाभूल करून कापसाच्या बिलाची रक्कम न देता सदर रकमेचा मोठ्या प्रमाणात अपहार केला. शेतकरी परमेश्वर मधुकर बडे (रा. नित्रुड, ता. माजलगाव) यांच्या फिर्यादीवरून जिनिंग चालक सुदीप संपत आरे व प्रदीप संपत आरे (रा. चिंचाळा ता. वडवणी) या दोन बंधूंविरोधात २५ जुलै रोजी रात्री उशिरा वडवणी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास स.पो.नि. नितीन मिरकर करत आहेत.
फसवणूकप्रकरणी जिनिंग चालकाविरोधात वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 4:32 AM