शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
2
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
3
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
4
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
6
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
7
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
8
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
9
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
10
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
11
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!
12
अमेरिकेत संक्रमित गाजर खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू, अनेक जण आजारी; १८ राज्यांमधून परत मागवले
13
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
14
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
15
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
16
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
17
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
18
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
19
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
20
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?

लाच प्रकरणातील १० हजार रूपये गायब करणाऱ्या निवृत्त सहाय्यक फौजदारावर बीडमध्ये गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 7:44 PM

सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार भाऊराव धोंडीराम पवार यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड : लाच प्रकरणात हस्तगत केलेली रोख १० हजार रुपयांची रक्कम गायब केल्याप्रकरणी शिवाजीनगर ठाण्याचे तत्कालीन मोहरीर तथा सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार भाऊराव धोंडीराम पवार यांच्याविरोधात बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी सायंकाळी पोलीस अधीक्षकांनी हे आदेश दिले. मुद्देमालात अफरातफर केल्याचा ठपका ठेवला आहे.

एसीबीने लाच स्वीकारताना पकडलेली रक्कम शिवाजीनगर ठाण्याच्या ताब्यात दिली. क्राईम मोहरीर म्हणून भाऊराव पवार हे होते. त्यांनी हा मुद्देमाल सुरक्षित ठेवणे अपेक्षित होते. मात्र, पाचपैकी रोख रक्कम असलेला मुद्देमाल पवार यांनी गहाळ केला. हा प्रकार निदर्शनास आल्यावर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी त्यांची चौकशी लावली. प्राथमिक चौकशीत पवार दोषी आढळले. त्यानंतर त्यांची अंबाजोगाईचे अपर पोलीस अधीक्षक अजित बोराडे यांच्याकडे विभागीय चौकशी सोपविली.

बोराडे यांनी तीन सरकारी साक्षीदारांसह पवार यांचा जवाब व इतर पुराव्यांवरुन त्यांना दोषी ठरविले. त्यानंतर २६ आॅक्टोबर रोजी पोलीस अधीक्षकांकडे अंतिम अहवाल पाठविला. अधीक्षकांनी यावर २४ नोव्हेंबर रोजी शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे पुर्भे यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी विश्वासघात करुन सदर रकमेत अपहार करुन स्वत:साठी वापर केला.  बुद्धीपरस्पर वाट लावून एसीबीचा पुरावा नष्ट केला, असा ठपका ठेवत पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पगार हे करीत आहेत.

काय होते प्रकरण ?वडिलांनी विक्री केलेल्या प्लॉटच्या फेरफार नोंदणीविरोधात केलेल्या अपिलाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावण्यासाठी एका व्यक्तीने २५ हजार रुपयांची लाच मागितली होती. पैकी १० हजार रुपये स्वीकारताना त्याला १८ फेब्रुवारी २०१६ रोजी बीडच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने पकडले होते. रकमेसह त्याच्याकडून इतर मुद्देमाल जप्त केला होता. एसीबीचे पोलीस निरीक्षक जी. व्ही. वाघ यांच्या फिर्यादीवरुन शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा सर्व मुद्देमाल मोहरीर, भाऊराव पवार यांच्या ताब्यात होता.

चौकशीत दोषी मुद्देमाल गहाळ झाल्याचे समजताच चौकशी केली. यात दोषी आढळल्याने संबंधित मोहरीरवर गुन्हा दाखल केलेला आहे. अधिक तपास सुरु आहे.- जी. श्रीधर पोलीस अधीक्षक

टॅग्स :Beed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारीCorruptionभ्रष्टाचारPoliceपोलिस