बीड : देशातील ई-कॉमर्स व्यवसायात, मोठ्या परदेशी कंपन्यांकडून देशाच्या कायद्याचे उघड उल्लंघन होत आहे. त्यामुळे कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केलेल्या आवाहनानुसार देशातील २० हजारांहून अधिक व्यापारी संघटनांच्या वतीने सर्व राज्यांच्या पाचशेहून अधिक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना निवेदन दिले. त्यानुसार गुरुवारी बीड शहर, बीड तालुका, बीड जिल्ह्यातील सर्व कॅटच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना निवेदन दिले. यावेळी कॅटचे जिल्हाध्यक्ष संतोष सोहनी यांच्यासह शहराध्यक्ष विनोद पिंगळे व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. ॲमेझॉनच्या आर्थिक कागदपत्रांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी निवेदनात केली आहे. परदेशी कंपन्यांना देशातील कायदे आणि नियमांचे उल्लंघन करण्याची परवानगी दिली जाऊ शकते किंवा सरकार देशातील नियम आणि कायद्यांचे वर्चस्व कायम ठेवते, याचा निर्णय सरकारने घ्यायचा आहे. देशातील व्यापारी सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहतील, असे या निवेदनात कॅटच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
230921\23_2_bed_11_23092021_14.jpeg
कॅटच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन