याप्रसंगी शाळेचे माजी शिक्षक भालचंद्र खुर्पे यांच्यातर्फे शाळेतून इयत्ता दहावीत प्रथम आलेली अपर्णा विष्णू शिंदे हिला रोख एक हजार रुपये, तसेच सेवानिवृत्त शिक्षक एम. बी. चांदमारे यांच्यातर्फे हिंदी विषयात प्रथम आल्याबद्दल रोख बक्षीस देण्यात आले. द्वितीय आलेली ऐश्वर्या राजू भुजंगे, तृतीय गायत्री प्रकाश सातपुते हिला स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले, तसेच इयत्ता नववीमध्ये प्रथम आलेली ऋतुजा हनुमंत कोल्हे हिचा व तिच्या पालकांचा सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन शरद नायबळ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब सोनसळे, मधुकर मकसरे, लता पारगावकर, मंदा सारूक, संगीता राठोड, दिनकर वाघमारे, गोरक्षनाथ घाटूळ, संजय माने, अनिता कुलकर्णी, विलास रेवलकर, बालासाहेब कांबळे, संगीता शिंदे, गोरख उघडे, शिवाजी काळे आदींनी परिश्रम घेतले.
170921\purusttam karva_img-20210917-wa0040_14.jpg