यावेळी अमर डागा यांनी राग, भजन, भैरवी आपल्या बासरी वादनातून सादर केली. त्यांना तबला वादनाची साथसंगत के. सी. चव्हाण आणि सुधीर देशमुख यांनी दिली. या प्रसंगी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद बीड शाखेच्या अध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोनामुळे ११ महिन्यांनंतरचा हा पहिला कार्यक्रम घेताना मनस्वी आनंद होत असल्याचे त्या म्हणाल्या. शहरातील कलागुणांना वाव देण्यासाठी नाट्यपरिषद तत्पर राहील. इथून पुढे दर महिन्याच्या ११ तारीखला विविध कार्यक्रम घेतले जातील असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास डॉ. उज्ज्वला वनवे, महेश वाघमारे, वासुदेव निलंगेकर, कासट तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. ए. एस. हंगे, उपप्राचार्य शिवानंद क्षीरसागर, पदव्युत्तर विभागप्रमुख डॉ. रेखा गुळवे, कमवि उपप्राचार्य सय्यद लाल, पर्यवेक्षक प्रा. जालिंदर कोळेकर व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचरलन डॉ. संजय पाटील देवळाणकर यांनी केले.