बीड : तुरीपाठोपाठ नाफेडने हरभरा खरेदी बंद केल्यामुळे नोंदणी केलेले २१ हजार ६४६ शेतकरी वंचित राहिले असून त्यांचा सुमारे १ लाख १५ क्विंटल हरभरा खरेदी झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त झाल्यानंतर अखेर केंद्र सरकारने मंगळवारी १३ जूनपर्यंत हरभरा खरेदीला मुदतवाढ दिली. मात्र गोदामांचा अभाव आणि बारदाण्याची टंचाई लक्षात घेता सहा दिवसात संपूर्ण हरभरा खरेदी होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे सरकारला पुन्हा मुदतवाढ द्यावी लागणार आहे.
जिल्ह्यातील १५ केंद्रांवर १ मार्चपासून हरभरा खरेदी सुरु झाली होती. ३२ हजार ४४६ शेतक-यांनी हमीदराने हरभरा विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. २९ मे पर्यंत १० हजार ८०० शेतकºयांचा १ लाख ५५ हजार ५३९ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. हरभरा खरेदी बंद केल्यामुळे नोंदणी केलेले २१ हजार ६४६ शेतकरी वंचित राहिले आहेत. या शेतकºयांकडे जवळपास १ लाख १५ हजार क्विंटल हरभरा पडून आहे.
शेतक-यांनी केलेल्या नोंदणीनुसार गेवराई तालुक्यात १० हजार क्विंटल, माजलगाव तालुक्यात २० हजार, पाटोद्यात ३ हजार, कडा येथे ४ हजार, केजमध्ये ६ हजार, धारुरमध्ये ७ हजार ६००, शिरुरमध्ये ५ हजार, परळीत ७ हजार ६००, वडवणीत ८ हजार, आष्टीत १५००, पारनेरमध्ये २ हजार, बर्दापूर येथे १० हजार, घाटनांदूरमध्ये ५ हजार, म. पाटोदा येथे २ हजार तर अंबाजोगाईत २५ हजार क्विंटल असा १ लाख १५ हजार क्विंटल हरभरा अद्याप खरेदी झालेला नाही.निर्णयातच गेला वेळ : आजपासून खरेदीशासनाचा हरभºयाला प्रतीक्विंटल ४ हजार ४०० रुपये हमीभाव आहे. त्यामुळे शेतकºयांचाही प्रतिसाद मिळाला. परंतु, पुरेसे गोदाम, बारदाण्याचा अपुरा पुरवठा यामुळे खरेदी प्रक्रिया रखडत गेली. त्यात मुदतवाढीचा निर्णय घेताना ८ ते १० दिवसांचा वेळ वाया गेला. पुढील ६ दिवसात खरेदी करताना विविध अडचणींचा सामना स्थानिक यंत्रणेला करावा लागणार आहे.बुधवारी याबाबत रितसर आदेश प्राप्त झाले. परंतु, बारदाना नसल्याने तसेच यंत्रणा सुरळीत करण्याच्या कामामुळे जिल्ह्यात कुठेही खरेदी सुरु करता आली नाही. त्यात पावसाळा सुरु झाल्याने खरेदी प्रक्रिया विस्कळीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गोदामात माल गेल्यावरच पेमेंटबीड जिल्ह्यात खरेदी केलेल्या १ लाख ५५ हजार क्विंटलपैकी केवळ २० हजार क्विंटल हरभरा गोदामात पाठविता आला. उर्वरित खरेदी केलेला १ लाख ३५ हजार क्विंटल हरभरा केंद्रांवर पडून आहे. तो रितसर गोदामात गेल्याशिवाय शेतक-यांच्या पेमेंटचा प्रश्न कायम राहणार आहे.
माजलगावात मोड फुटले माजलगाव येथील बाजार समितीच्या आवारातील शासकीय खरेदी केंद्रावर मंगळवारी पहाटे झालेल्या पावसाने शेतकºयांचा मापाविना पडून असलेला २० हजार क्विंटल हरभरा भिजला होता. शासनाने मुदतवाढ दिल्याने जिल्हा मार्केटिंग विभागाने हरभरा खरेदी करण्याचे आदेश दिले असले तरी बारदानाच उपलब्ध नसल्याने खरेदी बंद असून भिजलेला हरभरा तसाच पडून आहे. शासनाच्या वतीने शेतमाल हमीभावाने खरेदी करण्यासाठी बाजार समिती मार्फत शासकीय खरेदीकेंद्र सुरु करण्यात आले आहे.