लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात १४४ छोटे, मोठे प्रकल्प आहेत, त्यापैकी जवळपास ३५ प्रकल्पांमध्ये पाण्याचा थेंब देखील शिल्लक नाही. ज्या प्रकल्पामध्ये पाणी साठा शिल्लक आहे, त्याठिकाणी उसाचे क्षेत्र जास्त आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पुढील काळात गंभीर होण्याची भिती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांचा ऊस देखील शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे पाणी देणे गरजेचे आहे, त्यामुळे होणारा पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे जिल्ह्यातील १४४ लघु व मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा ५० टक्क्यांपेक्षा कमी शिल्लक आहे. तसेच सर्व प्रकल्प मृत साठ्यात असून पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. शहरी व ग्रामीण भागाला पाणीपुरवठा या प्रकल्पामधून केला जातो. बीड सह इतर मोठ्या शहरामध्ये ८ ते १५ दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. पाणी उपसा अशाच पद्धतिने सुरु रहिला तर पुढील ७ ते ८ महिने कसे काढायचे असा प्रश्न सामान्य नागरिकांपुढे उभा राहिला आहे.प्रकल्प क्षेत्राच्या जवळपास मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे, काही ठिकाणी तोडणी सुरु झाली आहे. तर अनेक ठिकाणी शेवटच्या टप्प्यात उसाचे पिक आहे. त्यामुळे एक, दोन वेळेस पाणी देण्याची गरज असल्याचे शेतकºयांनी सांगीतले. मात्र, पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणात झाला तर शहरी व ग्रामीण भागातील नागिरकांना पाणी संकटाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यूत मोटार व इंजिनच्या माध्यमातून होणार पाणी उपसा रोखण्याची मागणी नागरिकांमधून होऊ लागली आहे.शेतकºयांच्या पिकांचा प्रश्न असल्यामुळे पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.पाणी उपसा रोखा; ग्रामपंचायतने घेतला ठरावपाटोदा तालुक्यातील मुगगांव व परिसरातील इतर गावांना इंचरणा तलावामधून पाणी पुरवठा केला जातो. मात्र इंचरणा तलावामधून विद्यूत मोटारी व इंजिनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा केला जात आहे. तो रोखण्यात यावा यासाठी मुगगांव ग्रामपंचायतच्या वतीने ठराव घेण्यात आला आहे. तसेच तहसिल व इतर संबंधीत प्रशासकीय कार्यालयास इंचरणा तलावातून पाणी उपसा रोखण्याच्या मागणीसाठी निवेदन दिले आहे. वेळोवेळी निवेदन देऊन देखील पाणी उपसा करणाºयांवर कुठली कारवाई केली जात नसल्याचे ग्रामपंचायने पत्राद्वारे कळविले आहे.
बीड जिल्हा प्रशासनापुढे पाणी उपसा रोखण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 12:22 AM
शेतकऱ्यांचा ऊस देखील शेवटच्या टप्प्यात असल्यामुळे पाणी देणे गरजेचे आहे, त्यामुळे होणारा पाणी उपसा रोखण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.
ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा : मृत साठ्याताली लघु, मध्यम प्रकल्पातील पाणी उपसा सुरुच