लोकमत न्यूज नेटवर्कबीड : रोजगार निर्मितीचा प्रयत्न व लहान उद्योग व्यवसायातून समृद्धीसाठी सरकारने सुरु केलेल्या मुद्रा लोन योजनेंतर्गत जिल्ह्यात आॅक्टोबरअखेर ११४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी दिलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठीच्या कालावधीत ११२ कोटी रुपयांचे मुद्रा लोन वाटप करण्याचे आव्हान आहे.मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अॅन्ड रिफायनान्स एजन्सीअंतर्गत सूक्ष्म, लघु व मध्याम स्वरुपाच्या व्यवसाय, उद्योगांसाठी ही कर्ज योजना आहे. शिशू गट, किशोर गट आणि तरुण गट अशा तीन विभागात मुद्रा लोन दिले जाते. शिशू गटात ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. यासाठी १० ते १२ टक्के व्याज दर आहे. तर किशोर गटांतर्गत ५० हजार ते ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या गटासाठी १४ ते १७ टक्के व्याज दर आहे. तरुण गटात ५ लाख ते १० लाखांपर्यंत कर्ज १६ टक्के व्याज दराने दिले जाते.बीड जिल्ह्यात चालू वर्षात मुद्रा लोन वितरणासाठी २२६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी १२० कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. या योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी शिशू, किशोर व तरुण गटातून विविध राष्टÑीयकृत बॅँकांमध्ये इच्छुकांचे प्रस्ताव आले होते. कर्जफेडीची क्षमता व इतर निकषात पात्र असलेले प्रस्ताव मंजूर करण्यात आले.बीड जिल्ह्यात राष्टÑीयकृत विविध १३ बॅँका असून या बॅँकांच्या ९३ शाखांमार्फत मुद्रा लोनचे उद्दिष्ट व प्रस्तावानुसार वाटप करण्यात आले. यात एसबीआयच्या ४८ शाखांचा समावेश असून एसबीआयमार्फत मुद्रा लोन वाटपाचे प्रमाण जास्त आहे.जिल्ह्यात १८ हजार ५३८ लाभार्थ्यांना ११४ कोटी रुपयांचे कर्ज या योजनेंतर्गत वाटप केले आहे. जिल्ह्याला २२६ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. १ एप्रिल ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत उद्दिष्टाच्या तुलनेत ५० टक्के कर्ज वाटप करण्यात आले आहे. शिशू गटांतर्गत १६ हजार ४९६ जणांना ५० हजार रुपयांपर्यंत या प्रमाणे एकूण ४० कोटी रुपये वाटप करण्यात आले. तर किशोर गटात १ हजार ६२२ इच्छुकांना एकूण ४० कोटी तर तरुण गटात ४२० जणांना ३४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. या गटात उत्पादन, व्यापार व सेवा क्षेत्रातील कर्जदारांचा समावेश आहे.
११२ कोटी रुपये मुद्रा लोन वाटपाचे बॅँकांसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 12:47 AM
रोजगार निर्मितीचा प्रयत्न व लहान उद्योग व्यवसायातून समृद्धीसाठी सरकारने सुरु केलेल्या मुद्रा लोन योजनेंतर्गत जिल्ह्यात आॅक्टोबरअखेर ११४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी दिलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठीच्या कालावधीत ११२ कोटी रुपयांचे मुद्रा लोन वाटप करण्याचे आव्हान आहे.
ठळक मुद्देबीड जिल्ह्यात १८ हजार ५३८ लाभार्थी : उद्दिष्ट २२६ कोटींचे, मंजूर १२० कोटींपैकी ११४ कोटी रुपयांचे मुद्रालोन वाटप