बीड : येथील जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी कक्ष बुधवारपासून सुरू करण्यात आला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते या कक्षाची सुरूवात करण्यात आली. औरंगाबादनंतर बीडमध्ये पहिल्यांदा हा कक्ष स्थापन होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.स्तन, तोंडाचा कॅन्सर असलेले रुग्ण बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहेत. या रुग्णांना केमोथेरपी करण्यासाठी बार्शी, औरंगाबाद, पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जावे लागत होते. हाच धागा पकडूून जिल्हा रुग्णालयात हा कक्ष स्थापन करण्यात आला. त्यामुळे रुग्णांचा आर्थिक भुर्दंड कमी होणार असूून, हेलपाटेही बंद होणार आहेत. बुधवारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्या हस्ते या कक्षाचे उद्घाटन करण्यता आले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी लक्ष्मीकांत तांदळे, डॉ.वाघमारे, डॉ.अनंत मुळे, डॉ.अक्षय भोपळे, मेट्रन विजया सांगळे, डॉ.शोएम इनामदार, डॉ.अजयकुमार राख, डॉ.पवन राजपूत, डॉ.अनंत कुलकर्णी, क्षीरसागर, मिसाळ, गायकवाड, अक्षय सोनटक्के, अजय ढाकणे, अशोक मते, डॉ.गवते, अंबादास जाधव, सुरेश दामोदर, श्रीकांत उजगरे, ऋषिकेश शेळके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
बीड जिल्हा रुग्णालयात केमोथेरपी कक्ष सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2019 11:56 PM