यामुळे मागील तीन-चार दिवसांपासून मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व कर्मचारी धावपळ करताना दिसत होते. या इमारतीसह शहरात अनेक ठिकाणी कटआउट लावण्यात आले, तर अनेक वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या. परंतु, या जाहिरातीमध्ये मुख्याधिकारी यांनी उपाध्यक्षा सुमनबाई माणिकराव मुंडे यांचा फोटो मुद्दाम होऊन घेतला नाही तर त्यांचे नावही सर्वांत शेवटी प्रमुख पाहुण्याच्या नंतर टाकण्यात आले असल्याचे एका नगरसेवकाने सांगितले.
यामुळे शहरात वेगळी चर्चा सुरू झाली. मुख्याधिकारी व उपाध्यक्ष यांच्यामध्ये मागील चार महिन्यांपासून विस्तवही जात नाही. यामुळे मुख्याधिकारी यांनी मुद्दाम त्यांचे नाव गाळले असल्याची चर्चा दिसून येत होती. यामुळे महिला पदाधिकाऱ्यांचा अवमान झाल्याची भावना महिला पदाधिकारी यांच्यात निर्माण झाली आहे.
याबाबत उपनगराध्यक्षा सुमनबाई मुंडे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, याबाबत मला कसलीच माहिती नव्हती. ही माहिती मला संध्याकाळी समजली. आम्ही गरीब व अल्पसंख्याक असल्यामुळे आम्हाला अशी वागणूक दिली जात आहे, असे त्यांनी सांगितले. याबाबत मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलणे टाळले.