सेवा मिळत नसल्याने मोबाईलधारक हैराण
बीड : बीड शहर व परिसरातील ग्रामीण भागात दूरसंचारची मोबाईल सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. समोरच्या व्यक्तीला फोन लावला तरी रेंज उपलब्ध नसते. जर रेंज उपलब्ध असेल तर ती व्यक्ती ‘आऊट ऑफ कव्हरेज एरिया’ असे सांगितले जाते. अशी स्थिती इंटरनेट कनेक्शन बाबतीतही झाली आहे. सोशल मीडियाचा वापर करताना मोबाईलमध्ये रेंज दिसते. मात्र, कामकाज होत नाही. अशा स्थितीमुळे मोबाईलधारक हैराण झाले आहेत.
अतिक्रमणांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
माजलगाव : शहरातील बसस्थानकासह शासकीय कार्यालयांच्या इमारतीना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा होत आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावर हातगाड्यांची गर्दी असते. याबाबत येथील नागरिक तक्रारी करीत आहेत. परंतु याकडे अद्यापही संबंधितांनी दुर्लक्ष केले आहे.
अध्यक्षपदी भोसले, उपाध्यक्षपदी देशमुख
बीड : सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती मार्गदर्शक आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. बैठकीत नूतन कार्यकारिणीत अध्यक्ष म्हणून मुकुंद भोसले, उपाध्यक्षपदी परवेज देशमुख, वैभव चिरके यांची निवड करण्यात आली. बैठकीला आसाराम गायकवाड, अशोक रोमण, प्रा. विजय पवार, भाऊसाहेब डावकर, झुंजार धांडे, अक्षय जाधव, रमेश चव्हाण उपस्थित होते.
जनसेवा ग्रुपच्यावतीने क्रिकेट कीटचे वाटप
बीड : येथील जनसेवा ग्रुपच्यावतीने यंदाही विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या ग्रुपच्यावतीने तीन संघांना क्रिकेट कीटचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. रमेश शिंदे, हेमंत कवठेकर, प्रदीप मुजमले, सतीश लोखंडे, धम्मदीप कोरडे, शरद ससाणे आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी ग्रुपच्या उपक्रमाचे कौतुक केले.