केज : उचल घेतलेली रक्कम परत का देत नाहीस या कारणावरून हॉटेल चालकाने अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याची घटना केज शहरात घडली. याप्रकरणी हॉटेल चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.शहरातील धारूर चौकात असलेल्या सुहाना नावाच्या हॉटेलवर साळेगाव येथील एक अल्पवयीन मुलगा वेटर म्हणून काम करीत होता. त्याने हॉटेल चालक बबलू खुरेशी याच्याकडून ११ हजार रुपयांची उचल घेतली. घेतलेली उचल परत कर म्हणून खुरेशी याने तगादा लावला. मात्र, माझ्याकडे पैसे नाहीत, पैसे आल्यावर देतो असे त्या मुलाने सांगितले. या कारणावरून खुरेशी याने मुलाचे ८ मार्च रोजी रात्री ७ वाजता अपहरण केल्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी केज ठाण्यात दिली. या तक्रारीवरून खुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
हॉटेल चालकाकडून मुलाचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 1:09 AM