बीड : बालकांचा वाढत असलेला गुन्हेगारीतील समावेश ही धोक्याची घंटा असून, ही गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रशासनासोबतच पालकांनी देखील काळजी घेणे गरजेचे आहे. मागील दोन वर्षात गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात बालकांचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यातील गुन्हेगारीचे वाढलेली आहे. रोज नवनवीन प्रकारचे गुन्हे घडत आहे. पोलिसांकडून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा बंदोबस्त वेळोवेळी केला जातो. मात्र, अनेक काही प्रकरणांमध्ये १८ वर्षाखालील नाबालीक मुलांचा समावेश असल्याचे चित्र आहे. याची कारणं मात्र, विविध गुन्ह्यात वेगवेगळी आहेत. सामाजिक वातावरण, मित्रांची संगत सिनेमातील कथा, गरिबी, पालक व मुलांची व्यसनाधिनता, शिक्षणाचा अभाव यासह इतर कारणांमुळे मुले गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळताता आणि गंभीर स्वरूपाच्या गुन्हेगारी विळख्यात अडकताना दिसून येत आहे. दरम्यान याला आळा घालण्यासाठी पालकांसोबतच, शिक्षक आणि समाज म्हणून आपली सर्वांचीच जबाबदारी आहे.
मागील घडलेल्या काही घटनांमध्ये महिला अत्याचार, चोरी, विनयभंग यासारख्या गुन्ह्यांची नोंद विविध पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. विद्यालात किंवा महाविद्याल शिक्षण घेत असताना, मुलं वयात येत असतात. त्यांना या वयात लैंगिक आकर्षण असते मात्रा, यासंबंधित असलेला शिक्षणाचा अभाव यामुळे विनयभंग किंवा अत्याचाराचे गुन्हे घडण्याची शक्यता असते. असे मत राज्य बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांनी व्यक्त केले.
कायद्यातील तरतुदी
१८ वर्षाखालील विधीसंघर्षग्रस्त मुलांच्या बुद्धीचा पूर्ण विकास झालेला नसतो. मुलांना जे वातावरण मिळते तसे ते घडत असतात. या विधीसंघर्षाला समाज जबाबदार आहे. अशा मुलांना बालन्यायमंडळासमोर उपस्थित केल्यानंतर बालन्यायमंडळ त्या मुलांच्या पुनर्वसनासाठी काम करते अशी कायद्यात तरतुद असून, त्याला शिक्षण किंवा व्यावसाय शिक्षण दिले जाते. अशा स्वरूपाच्या विधीसंघर्षग्रस्त मुलांचे समोपदेशन व मार्गदर्शन केले जाते. केले जाते.
पालकांचे देखील करावे लागते समोपदेशन
एखाद्या प्रकरणात मुलगा विधीसंघर्षग्रस्त झाला तर, पालकांची मानसिकता त्याला पाठिंबा देण्याची नसते. त्यामुळे जामीन घेण्यासाठी देखील ते येत नाहीत. त्यानंतर पालकांना या मुलाने असे का केले याविषयी समजूत घालून समोपदेशन करावे लगते. दरम्यान अनेक विधिसंघर्ष मुलांमध्ये काळानुसार चांगले बदल देखील झालेले आहेत. असे देखील राज्य बालहक्क कार्यकर्ता तत्वशील कांबळे यांनी सांगितले.
१८ वर्षाखालील मुलांवर दाखल गुन्हे
२०१९
अत्याचार -४
चोरी -२
खंडणी -१
विनयभंग-१
२०२०
चोरी २
अनैसर्गिक संभोग-१
खुनाचा प्रयत्न-१