पहिल्या लाटेमध्ये वृद्ध व ज्यांना काही आजार आहे त्यांच्यामध्ये एमएसआयसी आजार दिसून आला. तर दुसऱ्या लाटेमध्ये ३० ते ४५ वर्षाच्या बऱ्याच लोकांना हा आजार दिसला. त्यामुळे जास्त वयोगटाच्या लोकांमध्ये सिम्प्टोमॅटिक अथवा असिम्प्टोमॅटिक इन्फेक्शन होऊन प्रतिकार शक्ती म्हणजेच अँटीबॉडीज तयार झाल्या असतील. या वयोगटातील बऱ्याच लोकांना लस मिळाल्यामुळे त्यांच्या अंगात कोरोनाच्या विरुद्ध प्रतिकारशक्ती तयार झाली असेल, असे मानले जाते. तिसरी लाट जर आली तर या ३० पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींमध्ये व मुलांमध्ये इन्फेक्शन जास्त होईल ,असेही बोलले जात होते. तर बालरोग तज्ज्ञांच्या पाहणीत ज्या- ज्या कुटुंबांमध्ये मोठ्यांना कोरोना झाला त्या कुटुंबातील लहान मुलांमध्ये सुद्धा हे इन्फेक्शन झालेले आढळून आले आहे. डिसेंबर, जानेवारीत झालेल्या सिरो सर्वेक्षणात
मोठी माणसं व मुलांमध्ये बरोबरीने २५ टक्के एवढ्या अँटीबॉडी तयार झाल्याचे दिसून आले.
मुलांना कोरोना झाल्यानंतर ६ आठवडे ते तीन महिन्यांच्या कालावधीत त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. एक ते दोन टक्क्यांमध्ये तीव्र कोरोना अथवा एम.एस. आय.सी. (मल्टी सिस्टेमिक इनफ्लामेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन) हा लहान मुलांमध्ये दिसणारा प्रकार दिसतो. त्यामुळे लहान मुलांना जरी इन्फेक्शन झाले तरीही त्यामध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या आजाराचे प्रमाण जास्त असेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. बहुतांश मुलांना तर इन्फेक्शन झालेले कळलेदेखील नाही. आपल्या मुलांना ताप, सर्दी , जुलाब ,खोकला आल्यास त्वरित बालरोग तज्ज्ञांना दाखवावे व आवश्यक तपासण्या करून घ्याव्यात. मुलांना काही लक्षणे दिसली तर घरी उपचार करून वेळ वाया घालवू नये, असे बालरोग तज्ज्ञ डॉ. अनुराग पांगरीकर म्हणाले.
----
जिल्ह्यातील एकूण कोरोना रूग्ण - ९१,६८३
कोरोनावर मात केलेले रूग्ण - ८७,९४१
उपचार घेत असलेले रूग्ण - १,२५२
एकूण मृत्यू - २,४९०
जिल्ह्यात ८ हजाराहून जास्त बालकांना कोरोना (बॉक्स)
आतापर्यंत जिल्ह्यात ८ हजार २०० पेक्षा जास्त बालकांना कोरोना झाला. सध्या किती जणांवर ७० ते ८० बालकांवर उपचार सुरू आहेत. यात वीस वर्षाखालील मुलांचा समावेश आहे. मागील काही दिवसातील अहवालांवर नजर टाकली असता २ ते १० वयोगटातील मुलेही कोरोनाबाधित आढळली आहेत.
अशी आहेत लक्षणे (बॉक्स)
मुलांना खूप ताप येणे. तो पाच दिवसांपर्यंत कमी न होणे.
मुलांच्या सतत पोटात दुखणे.
मळमळ, उलट्या होणे.
त्वचेवर रॅशेस पडणे.
डोळे लाल होणे.
-----
ही घ्या काळजी
मुलांना मास्कशिवाय बाहेर पडू देऊ नका
कुठलेही लक्षण आढळल्यास तातडीने डॉक्टरांना दाखवा
कोरोनातून बरे झालेल्या मुलांकडेही लक्ष ठेवावे. मुलांना कोठूनही इन्फेक्शन होणार नाही, याची काळजी घ्यावी.
-------
‘एमएसआयसी’ आजाराबाबत सतर्क राहणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्यात यासाठी वेगळे सर्वेक्षण केलेले नाही. मात्र जास्तीत जास्त चाचण्या करून पॉझिटिव्ह रूग्णांचा शोध सुरूच आहे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्स पाळावे. ‘एमएसआयसी’चे मुलांमध्ये प्रमाण कमीच आहे. त्यांच्या बीसीजी व इतर नियमित लसीकरणामुळे हे असावे. - डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड.