शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
4
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
5
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
6
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
7
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
8
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
10
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
11
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
12
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
13
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
14
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
15
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
16
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
17
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
18
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
19
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
20
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण

उसतोड मजुरांची मुले राहणार शिक्षणाच्या प्रवाहात; स्थलांतर रोखण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 7:36 PM

विद्यार्थी संख्येनुसार अपेक्षित हंगामी वसतिगृहांना प्रशासकीय मान्यता

ठळक मुद्दे२८ हजार विद्यार्थ्यांना दिलासा  शिक्षण विभागाकडून ४५३ हंगामी वसतिगृहे सुरू

- अनिल भंडारी बीड : ऊस तोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या कामगारांच्या २८ हजार ५४० पाल्यांचे स्थलांतर रोखण्यात शिक्षण विभागाला यश आले आहे. ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात राहणार आहेत. 

जिल्ह्यातून दरवर्षी जवळपास पाच लाख कामगार ऊस तोडणीसाठी पश्चिम महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये जातात. साखर कारखान्यांच्या गाळप हंगामापर्यंत त्यांना ऊस तोडणीचे काम असल्याने त्यांना कुटुंबासह स्थलांतर करावे लागते. यामुळे त्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे आणि पाल्य शिक्षणाच्या प्रवाहात राहावा म्हणून समग्र शिक्षा अंतर्गत शासनाने हंगामी वसतिगृह योजना सुरू केली आहे. तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या संभाव्य स्थलांतराबाबत शिक्षकांनी सर्वेक्षण केले होते. विद्यार्थी संख्येनुसार अपेक्षित हंगामी वसतिगृहांना प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करुन वसतिगृहे सुरू करण्यात आली. 

१ डिसेंबरपासून बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात २०, आष्टी १३, बीड ६६, धारुर ८४, गेवराई ७७, केज ३७, माजलगाव ३४, परळी २३, पाटोदा २२, शिरुर कासार ४७, वडवणी तालुक्यात ३० वसतिगृहे सुरू झाली. यात १४ हजार ३२५ मुले व १४ हजार २१५ मुली मिळून २८ हजार ५४० विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. 

२० पटसंख्येला वसतिगृह नाहीप्रत्यक्ष पाहणीअंती २० पटसंख्येमुळे आष्टी तालुक्यात १, परळी तालुक्यात ५, वडवणी २, बीड ५ आणि शिरुर कासार तालुक्यात २ अशा १५ वसतिगृहांना मान्यता मिळू शकली नाही, येथील विद्यार्थ्यांना जवळच्या वसतिगृहातून सुविधा देण्याबाबत सूचना असून त्याबाबत लवकरच माहिती घेतली जाणार असल्याचे समजते. 

स्थलांतर घटले मागील वर्षी दुष्काळी स्थिती होती. शिरुर कासार तालुक्यात ३ हजार ४८३ विद्यार्थ्यांसाठी डीबीटी योजना राबविली होती. तर अन्य दहा तालुक्यात ५३२ वसतिगृहांना मंजुरी मिळाली होती. येथे ३६ हजार ८५६ विद्यार्थ्यांची सोय झाली होती. परंतु आॅक्टोबर- नोव्हेंबरमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे पीक परिस्थिती चांगली आहे. तसेच गाव परिसरातच शेतीकाम मिळू लागले आहे. त्यामुळे यंदा ऊस तोडणी कामगारांचे स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे.  

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीBeedबीडzp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थी