लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : पैठण-बारामती रोडलगत असलेल्या धस वस्तीवर उसाच्या शेतात रविवारी दुपारी एका शेतकऱ्याला बिबट्याचे अचानक दर्शन झाले होते. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने कर्मचारी सोमवारी सायंकळी उशिरा जाऊन केली असता तो बिबट्याचाच असल्याची माहिती पाऊल खुणावरून निष्पन्न झाले आहे.
आष्टी तालुक्यात काही महिन्यांपूर्वी नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला होता. याची मनातील भीती संपत नाही तोच आता परत चोभानिमगाव परिसरातील सोपान बापू थेटे या शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात रविवारी बिबट्याने अचानक दर्शन दिल्याने त्यांनी जीव मुठीत धरून वस्तीकडे धाव घेतली. यानंतर नागरिकांनी टोळक्याने पाहणी केली; पण कुठेच काही दिसून आले नसल्याने भयभीत झालेल्या शेतकऱ्यांनी आष्टी येथील वनविभागाच्या लोकांना याची दूरध्वनीवरून माहिती दिली.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी वनविभागाकडून वनरक्षक बाबासाहेब शिंदे, अशोक काळे, एस.व्ही. शेटे, वनमजूर देवराव कुमखाले, युनूस शेख यांनी जाऊन पाऊल खुणाची पाहणी केली. यावरून तो बिबट्याच असल्याची खात्री वनविभागाकडून केली आहे. तरी या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी माजी सरपंच विजय शेळके यांनी केली आहे.
....
नागरिकांनी दक्षता घ्यावी
चोभानिमगाव परिसरात वनविभाकडून बिबट्या दिसलेल्या शेतात जाऊन पाऊल खुणाची पाहणी केली आहे. यानंतर तो बिबट्याच असल्याचे निष्पन्न झाले आहे. तरी नागरिकांनी दक्षता, काळजी घ्यावी. बिबट्या दिसल्यास वनविभागाकडे संपर्क साधावा, असे आवाहन माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी श्याम शिरसाठ यांनी केली आहे.
240821\nitin kmble_img-20210824-wa0020_14.jpg~240821\nitin kmble_img-20210824-wa0021_14.jpg
बिबट्याचे ठसे आढळले~