परळी (बीड ): शहरातील विविध मार्गावरु न होणारी राखेची वाहतूक बंद झाल्याने परळीवासियांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे. महसूल व विद्युत प्रशासनाच्या निर्णयाचे विविध संघटनेने व सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वागत करत उघड्याने होणारी वाहतूक कायम बंद करावी अशी मागणी पुढे आली आहे.
परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या दाऊतपूर, टोकवाडी राख तळ्यातून दररोज दोनशे वाहनाद्वारे राख उचलून शहराच्या विविध मार्गाने वाहतूक चालू होती. ही वाहतूक रविवारपासून बंद करण्यात आली. कन्हेरवाडीच्या ग्रामस्थांनी ही वाहतूक रोखून शहरातील राखेच्या वाहतूक कोंडीमुळे निर्माण होणार्या समस्येला वाचा फोडली आणि महसूल, पोलीस व विद्युत प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राखेची वाहतूकच बंद केली.
पोलीस ठाणे, न.प.कार्यालय, वैद्यनाथ मंदिर परिसरातून बिनधास्तपणे राखेची उघडी वाहतूक होत होती. सोमवारी प्रशासनाच्या या निर्णयानंतर वाहतूकही सुरळीत झाली. राखेची उघडी वाहतूक कायम स्वरुपी वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे. निर्णयाबद्दल सामाजिक कार्यकर्ते चेतन सौंदळे म्हणाले, राखेच्या प्रदूषणामुळे जीव घेणे अपघात होत आहेत. राखेची उघड्या ट्रकद्वारे वाहतूक केली जात असल्याने राखेचे थर दुकानात व घरात जाऊन साचत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे. डोळ्याचे, श्वसनाचे, त्वचेचे गंभीर विकार होत आहेत. या दृष्टीने हा निर्णय योग्य असल्याचे ते म्हणाले. राखेच्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार जडत आहेत, आता लगाम लागेल. राखेची वाहतूक बंदी हा स्वागतार्ह निर्णय असल्याचे राकाँचे डॉ.संतोष मुंडे म्हणाले.
राखेच्या उघड्या वाहतुकीला तूर्त लगामशासनाने कायमस्वरु पी राखेची वाहतूक बंद केली पाहिजे. दाऊतपूर, गंगाखेड रोड, ईटके चौक, शिवाजीनगर, रेल्वेस्टेशन रोड, आझाद चौक, कन्हेरवाडी रोड, धर्मापुरी रोड, टोकवाडी रोड, परळी शहर, चादांपूर रोड, मलकापुर रोड, नंदागौळ रोड या मार्गाने दररोज २०० वाहनांतून राखेची वाहतूक केली जाते. याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. उघड्या वाहतुकीमुळे विविध आजारांमध्ये होत असल्याची तक्र ार कैलास तांदळे यांनी केली आहे. राख वापरणे पर्यावरणाचा सदुपयोग आहे. राखेची बंद वाहन किंवा आच्छादन अंथरून वाहतूक करावी, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.