सन २०१९-२० या खरीप व रब्बी हंगामासाठी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा विमा कंपनीकडे भरलेला आहे. परंतु, आजतागायत विमा कंपनी व सरकारकडून याबाबत धोरण जाहीर करण्यात आलेले नाही. बीड तालुका हा सतत अवर्षण, अतिवृष्टी व पिकांवर पडणारे विविध रोग यामुळे पिकांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अशा अस्मानी संकटाचा सामना करता करता शेतकऱ्यांचे फार हाल होत आहेत. त्यात भरीस भर म्हणून गेल्या वर्षापासून कोरोनासारख्या महामारीमुळे शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. बीड तालुक्यातील बहुतांशी गावांना अतिवृष्टीचा फटका बसला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. त्यामुळे बीड तालुक्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन, भुईमूग, बाजरी, तूर व रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा या पिकासाठी भरलेला विमा तत्काळ मंजूर करावा व तो शेतकऱ्यांच्या खात्यावर ताबडतोब जमा करावा, अशी मागणी डाके यांनी केली आहे.
खरीप, रब्बी पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:34 AM