परळी : जनतेच्या न्यायालयात मी स्वच्छ आणि निष्कलंक आहे, माझी प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही. परळीला जिल्हा न्यायालय यावे यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे, असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले.येथील वकील संघाच्या सभागृहात मंगळवारी शहरातील वकील बांधवांची बैठक झाली. यावेळी खा. डॉ. प्रितम मुंडे उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, वकील संघाने नेहमीच मला समर्थन दिलेले आहे. मी परळी मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर दिला आहे. परळी ते अंबाजोगाई रस्ता रखडला आहे त्यात माझा दोष नाही. पण विरोधकांकडून काम रोखण्याचा प्रयत्न करून मला बदनाम केले जात असल्याचे त्या म्हणाल्या. तरीही या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे. एक अपवाद सोडला तर गावोगावी रस्ते केले आहेत. विकास अगदी सर्व सामान्यांच्या दारापर्यंत पोहोचवला आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी बचत गट चळवळ गतीमान केल्याचे त्या म्हणाल्या.परळी न्यायालयासाठी आपण स्वतंत्र इमारत दिली, वकील संघासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधला, तुमच्या नेतृत्वाची परळीला आज गरज आहे असे सांगत विकासकन्येला साथ देण्याचे अभिवचन शहरातील वकिलांनी दिले.यावेळी परळी वकील संघाचे अध्यक्ष पी.एम.सातभाई, अॅड.उषा दौंड, अॅड.प्रकाश मराठे,अॅड.मिर्झा, अॅड.दिलीप स्वामी, अॅड.नागापूरकर, अॅड. आर.व्ही.गित्ते.अॅड.टि.के.गोलेर अॅड.डि.पी.कडबाने, अॅड.राजेश्वर देशमुख, अॅड.प्रदीप गिराम,अॅड.अरु ण पाठक, अॅड.जगन्नाथ आंधळे अॅड लक्ष्मण अघाव, अॅड.दत्तात्रय आंधळे, अॅड.पोतदार, अॅड.संंध्या मुंडे, अॅड.कल्याण सटाले, अॅड.विकास टेकाळे, अॅड.मार्तंड शिंदे, अॅड.लक्ष्मण गित्ते, अॅड.ज्ञानोबा मुंडे, अॅड.अमोल सोंळके, अॅड.सुभाष गित्ते, अॅड.गजानन पारेकर, अॅड.प्रल्हाद फड, अॅड.सुनिल सोनपीर, आदी उपस्थित होते.माफियागिरीला विरोधकांकडून मिळतेय प्रोत्साहनमला भ्रष्टाचारमुक्त आणि भयमुक्त परळी करायची आहे. विरोधक हे माफियागिरीला प्रोत्साहन देतात. मी जनतेच्या न्यायालयात स्वच्छ आणि निष्कलंक आहे. जनताही माझ्यासोबत आहे.हीच बाब विरोधकांना सहन होत नसल्यामुळे माझ्या विरोधात अफवातंत्र वापरले जात आहे. खोटे बोल पण रेटून बोल या भूमिकेने ते माझ्या विरोधात अपप्रचार करतात. पण जनता त्यांची गुरु आहे.या निवडणुकीत परळीतील स्वाभिमानी जनता मलाच मताधिक्य देणार असल्याचे त्या म्हणाल्या. विकासाची चळवळ कायम ठेवून शहराला स्मार्ट सिटी करण्यासाठी भरभरून आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी वकिलांनी चांगल्या नेतृत्वाच्या बाजूने राहून न्यायाची भूमिका घेऊन पंकजा मुंडे यांना साथ देण्याचे आवाहन केले. त्यास वकील बांधवांनी पाठिंबा दर्शविला.
स्वच्छ प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही -पंकजा मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 11:57 PM
जनतेच्या न्यायालयात मी स्वच्छ आणि निष्कलंक आहे, माझी प्रतिमा विरोधकांना सहन होत नाही. परळीला जिल्हा न्यायालय यावे यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी स्वतंत्र इमारत उभारली जाणार आहे, असे प्रतिपादन भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी केले.
ठळक मुद्देवकील बांधवांशी संवाद : परळीला जिल्हा न्यायालय आणणार