लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराची ओळख असणाऱ्या बिंदुसरा नदीच्या पात्रामध्ये झालेली घाण, वाढलेली झाडे, झूडपे, कचरा यामुळे नदीपात्र व परिसर अस्वच्छ झाला आहे. पावसाळ््यात नदीला येणाºया पाण्यामुळे पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ््यापूर्वी महास्वच्छता अभियान राबवण्याचा निर्णय शिवसंग्रामतर्फे घेण्यात आला आहे.
पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आ. विनायक मेटे यांच्या संकल्पनेतून बिंदुसरा नदीपात्र महास्वच्छता अभियान ३१ मे रोजी ७ वाजता राबवण्यात येणार आहे. या अभियानामध्ये ३ हजार कार्यकर्ते सहभाग घेतील अशी माहिती शिवसंग्रामचे प्रदेशअध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच बीड शहरतील नागरिकांनी व सामाजिक संघटनांनी या महास्वच्छाता अभियानामध्ये सहभागी होण्याचे आवाहन देखील मस्के यांनी केले.
नदीपात्राची झालेली दुरवस्था तसेच नदीपात्रातील अतिक्रमण कोणाच्या कृपेने झाले आहे हे सर्वाना माहिती आहे. तसेच बीड शहरातील अस्वच्छतेसाठी सर्वस्वी नगरपालिका जबाबदार आहे. न.प. मधील सत्ताधारी व विरोधक शहरात विकासाची कामे न करता फक्त राजकारण करत असल्याची टीका मस्के यांनी यावेळी केली.पत्रकार परिषदेला प्रभाकर कोलंगडे, सहास पाटील, ज्ञानेश्वर कोकटे, मनोज जाधव, उपस्थित होते.