आष्टी : संस्था नोंदणीसाठी सहा हजार रुपयांची लाच घेतांना सहाय्यक निबंधकास बीड येथील एसीबीच्या पथकाने गुरुवारी ( दि. १७ ) दुपारी रंगेहाथ पकडले.
याबाबत अधिक माहिती अशी की,आष्टी येथील सहाय्यक निंबधक सुधाकर वाघमारे आणि लिपीक कविता खेडकर यांनी तक्रारदारास संस्था नोंदणी करण्यासाठी सात हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याची तक्रार लाचलुचपत व प्रतिबंधक विभागात केली. यावरून गुरुवारी दुपारी आष्टी येथील सहाय्यक निंबधक कार्यालयात एसीबीने सापळा लावला. संध्याकाळी ५ वाजता अधिकारी वाघमारे याने लाचेची रक्कम लिपीक कविता खेडकरजवळ देण्यास सांगितले. यावेळी लिपीक खेडकरला ६ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलीस उपअधिक्षक बाळकृष्ण हानपुडे, पोलिस निरीक्षक राजकुमार पांडवी आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. आरोपींना आष्टी पोलीस ठाण्यात हजर आणण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.