- सतीश जोशीबीड : जिल्हा परिषद पदाधिका-यांच्या निवडीत सुरेश धस आणि आ. जयदत्त क्षीरसागर यांनी दिलेल्या धक्क्यातून राष्ट्रवादी सावरत नाही तोच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी क्षीरसागरांच्या बंगल्यावर जाऊन ‘चाय पे चर्चा’ केल्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीत अजित पवार यांनी आ. क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर आणि उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांना जवळ केल्यामुळे पवार आणि क्षीरसागर यांच्यामध्ये राजकीय तणावास सुरुवात झाली होती. मध्यंतरी अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या दोन कार्यक्रमांना तसेच बीडमध्ये निघालेल्या मोर्चासही आ. क्षीरसागर आणि त्यांचे बंधू ागराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी गैरहजेरी लावली होती. तेंव्हापासूनच क्षीरसागर बंधू हे राष्टÑवादीतून बाहेर पडतील, अशी चर्चा जोर धरीत आहे.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आ. क्षीरसागर यांचे चहापानाचे निमंत्रण स्वीकारुन त्यांच्या बंगल्यावर भेट दिल्याने वेगळी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांसमवेत पालकमंत्री पंकजा मुंडे, जलसंपदा मंत्री डॉ. गिरीश महाजन, आ. विनायक मेटे उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.विधानसभा निवडणुकीत बीडची एकमेव जागा राष्टÑवादीकडे राखण्यात क्षीरसागर यांना यश आले होते. बाकी पाचही ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. असे असताना भाऊबंदकीस राष्टÑवादीतूनच फूस मिळत असल्याने आ. क्षीरसागर हे अस्वस्थ्य आहेत. माजी मंत्री सुरेश धस, आ. जयदत्त क्षीरसागर, शिवसंग्रामचे आ. विनायक मेटे यांचे कधीही जिल्ह्यातील राजकारणात जमत नव्हते, परंतु बदलत्या राजकारणात या मंडळींची जवळीक वाढल्यामुळे बीड जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत.बंगल्यावरील भेटीची परंपराकेशरकाकू क्षीरसागर असताना त्यांच्या बंगल्यावर जाऊन शरद पवार यांनी जयदत्त क्षीरसागर यांची भेट घेतली होती. त्यानंतर जयदत्त क्षीरसागर हे काँग्रेस सोडून राष्टÑवादीत आले होते. बंगल्यावरच्या या भेटीची परंपरा यावेळीही कायम राहील, अशी चर्चा आहे.तुम्हीही बोलावले तर येईनचहापानाचे निमंत्रण होते म्हणून गेलो होतो, तुम्हीही बोलावले तर जरुर येईल. माझ्या इतर कार्यक्रमांपेक्षा या चहापानाच्या कार्यक्रमाला माध्यमातून अधिक प्रसिद्धी मिळेल, हे मला माहीत आहे. याचा खुलासा मी करणार नाही, परंतु जयदत्त अण्णा तुम्हाला मात्र या चहापानाचे खुलासे द्यावे लागतील. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुख्यमंत्री-क्षीरसागरांची ‘चाय पे चर्चा’ ! बीड जिल्ह्यात राजकीय भूकंप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 4:14 AM