बीड : पाटोदा तहसीलदार रुपा चित्रक यांनी तीन महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा निषेध करत कर्मचा-यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावेत तसेच तहसीलदार रुपा चित्रक यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने शनिवारी कामबंद आदोलन सुरु केले होते. संघटनेच्या पदाधिका-यांनी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याशी चर्चा केली. या वेळी ‘घर (कार्यालय) वापस आ जाओ’ अशी भावनिक साद घातली आणि कर्मचारी संघटनेने दुपारनंतर आपले आंदोलन मागे घेतले. दरम्यान या प्रकरणाची योग्य ती चौकशी करुन संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.पाटोदा तहसीलदार रुपा चित्रक या विविध कारणांवरुन चर्चेत आहेत. मागील तारखेनुसार कागदपत्रांवर स्वाक्षरी करणे, छावणी चालकांना तपसाणी करुन दंड आकारल्यनंतर पुन्हा दंडात्मक कारवाई मागे घेणे, यासह कर्मचाºयांना अपनास्पद वागणूक देणे, अधिकार नसताना जालना जिल्ह्यातून वाळू आणण्याचे आदेश देणे यासह विविध विषयांमुळे यापूर्वी त्या वादात अडकल्या होत्या.दरम्यान दोन दिवसांपूर्वी चित्रक यांनी तहसील कार्यालयातील तीन कर्मचा-यांवर फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यामध्ये एक तलाठी कोतवाल व मागील चार महिन्यांपासून रजेवर असलेल्या एक महिला कर्मचारी यांचा समावेश होता. हे गुन्हे चुकीच्या पद्धतीने स्वत:ची चूक झाकण्यासाठी दाखल केल्याचे महसूल संघटनेचे म्हणणे आहे. या कर्मचा-यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, तहसीलदार चित्रक यांची योग्य ती चौकशी करुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, यासह इतर विषयांच्यासंदर्भात जिल्हाधिका-यांची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी योग्य प्रतिसाद न दिल्यामुळे शनिवारपासून काम बंद आंदोलन करण्यात आले होते.मात्र, शनिवारी दुपारी तब्बल दीड तास संघटनेच्या पदाधिकाºयांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा झाली. यामध्ये या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी तीन उपजिल्हाधिकारी व जि.प.च्या एका कर्मचाºयाची त्रिसदस्य समिती नेमल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले तसेच त्यांच्याकडून तपास होऊन अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर गुन्हे दाखल असलेल्या कर्मचा-यांचे देखील चौकशी केल्यानंतर गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेऊ असे जिल्हाधिकारी यांनी पदाधिकाºयांना आश्वासन दिले व आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाºयांनी पुकारलेले कामबंद आंदोलन शनिवारी दुपारी मागे घेतले. यावेळी बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जिल्हाधिका-यांच्या भूमिकेचे टाळ्या वाजवून स्वागतमहसूल संघटनेच्या पदाधिका-यांनी जिल्हाधिकारी आस्तिकुमार पाण्डेय यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली.महसूल कर्मचाºयांनी चांगले काम करावे जिल्हाधिकारी म्हणून सदैव सोबत राहील, तसेच कर्मचाºयांच्या प्रश्नांसंर्भात दर ३ महिन्यानंतर बैठक घेतली जाईल असे जिल्हाधिकारी म्हणाले.दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बसलेल्या कर्मचाºयांना ‘घर वापस आ जाओ’ असे भावनिक आवाहन केले. तसेच नागरिकांची कामे करण्यासाठी आपण कायम तत्पर राहणे आवश्यक असल्याचे सांगितले.त्यानंतर कर्मचाºयांनी देखील टाळ्या वाजवून जिल्हाधिकाºयांच्या भूमिकेचे स्वागत केले.
कलेक्टर म्हणाले, घर आ जाओ; महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:53 PM
बीड : पाटोदा तहसीलदार रुपा चित्रक यांनी तीन महसूल कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. या प्रकरणाचा निषेध करत कर्मचा-यांवरील ...
ठळक मुद्देआश्वासन। तहसीलदार व गुन्हे दाखल प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही केली जाईल