तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी रात्री झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेल्या सोयाबीनसह खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आ. नमिता मुंदडा यांनी नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी केली, तसेच पंचनामे करून तत्काळ भरपाई मिळण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
तालुक्यात २३ सप्टेंबर रोजी रात्री अतिवृष्टी झाली. त्यात अनेक नद्यानाल्यांना पूर आले. तालुक्यातील साठवण तलावही ओसंडून वाहत असून त्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. आ. नमिता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा, तहसीलदार दुलाजी मेंडके, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत देशमाने, भाजपचे तालुका अध्यक्ष भगवान केदार व सरपंच संघटनेचे अध्यक्ष कैलास पाटील यांनी शेतावर जाऊन नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. यावेळी आ. मुंदडा यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून धीर दिला.
240921\img-20210924-wa0063.jpg~240921\img-20210924-wa0067.jpg
केज तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना आ नमिता मुंदडा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा ,भगवान केदार आदी~केज तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना आ नमिता मुंदडा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा ,भगवान केदार आदी