जिल्ह्यात शनिवारी ४०५६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. याचे अहवाल रविवारी प्राप्त झाले. यात ३१५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ८९७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळाले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ९७, आष्टी ११९, बीड ११६, धारुर ४८, गेवराई ७७, केज १३६, माजलगाव ७१,परळी ५७, पाटोदा १०२, शिरुर ४०, वडवणी ३४ जणांचा समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा ७४ हजार ४२२ इतका झाला आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ६६ हजार ६५२ इतकी झाली आहे. जुन्या ३६ तर २४ तासांत मृत्युमुखी पडलेल्या ९ जणांची नोंद आरोग्य विभागाकडे झाली. त्यामुळे बळींचा आकडा १४२३ इतका झाला आहे. सध्या ६ हजार ३४७ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जि.प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर.बी.पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.पी.के. पिंगळे यांनी दिली.
पुन्हा दिलासा; १०८५ कोरोनामुक्त तर ८९७ नवे रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 4:32 AM