जिल्ह्यात बुधवारी ३ हजार ८७७ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचे अहवाल गुरुवारी प्राप्त झाले. यात २ हजार ८८५ अहवाल निगेटिव्ह तर ९९२ अहवाल पॉझिटिव्ह आले. बाधित रुग्णांमध्ये पाटोदा तालुक्यात सर्वाधिक १६७, बीड १२९ अंबाजोगाई ७०, आष्टी ११४, धारुर ५३, गेवराई ९४, केज १०३, माजलगाव ५४, परळी ५५, पाटोदा १६७, शिरुर १२८ आणि वडवणी तालुक्यातील २५ जणांचा समावेश आहे. तसेच गुरुवारी जुन्या २१ व २४ तासांतील १४ अशा एकूण ३४ मृत्यूंची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. आता एकूण बाधितांचा आकडा ७८ हजार ६९३ इतका झाला असून, यापैकी ७१ हजार ७२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १६०१ इतकी झाली आहे. आता ६ हजार २० जणांवर उपचार सुुरू असल्याची माहिती सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.
पुन्हा दिलासा; बाधितांपेक्षा कोरोनामुक्त जास्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 4:35 AM