शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

घराकडे येतोय, फोनवर सांगून तो आलाच नाही; सकाळी सापडला मृतदेह, जवळ आढळले पिस्तुल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 11:59 AM

बीडमध्ये तरुणाच्या मृतदेहाजवळ गावठी पिस्तूल, हत्या की आत्महत्या

बीड: शहरातील स्वराज्यनगर भागात एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने ८ जून रोजी सकाळी एकच खळबळ उडाली. मृतदेहाजवळ गावठी पिस्तूल मिळून आले आहे. त्यामुळे हत्या की आत्महत्या याचे गूढ कायम आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय कोंडीराम भांडवले (२०,रा.बार्शी नाका, तेलगाव रोड, बीड) असे मयताचे नाव आहे. तो शहरातील एका ऑइल मिलमध्ये काम करायचा. ७ जून रोजी रात्री तो नित्याप्रमाणे घरी पोहोचला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री साडेआठ वाजता संपर्क केला. यावेळी घरी यायला किती वेळ आहे, असे आईने विचारले असता, घराकडे येत आहे, असे त्याने सांगितले. मात्र, तो घरी पोहोचलाच नाही. रात्री ११ वाजेनंतर तो फोनही घेईना, त्यामुळे कुटुंबीयांनी मित्रपरिवार, ऑइल मिल व नातेवाईकांकडे चौकशी केली, पण त्याचा ठावठिकाणा लागला नाही. 

अखेर ८ जून रोजी सकाळी सात वाजता स्वराज्यनगरातील रिकाम्या भूखंडातील दाट झाडीत त्याचा मृतदेह आढळून आला. शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि.केतन राठोड, सहायक निरीक्षक मनोजकुमार लोंढे, पो.ना.रवि आघाव, गणेश परजणे, विठ्ठल शिंदे, भगवान घोडके यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविला. दरम्यान, त्याच्या डोक्याला दोन्ही बाजूंनी छिद्र आहे. त्यामुळे खून की आत्महत्या, याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

दुचाकीवरील पार्सलच्या पट्टीने पटली ओळखघटनास्थळी  अक्षय भांडवले याची दुचाकी आढळली.  नंबरप्लेटवर ऑनलाइन मागविलेल्या पार्सलच्या नावाची पट्टी डकवलेली होती. त्यावरील नावावरुन ओळख पटली. तेथे एक गावठी पिस्तूल मिळून आली. ती जप्त केली आहे. अक्षयच्या मृत्यूने कुटुंब शोकमग्न झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडDeathमृत्यू