येथील गोदावरी कुंकुलोळ योगेश्वरी कन्या शाळेच्या सभागृहात गटशिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हास्तरीय खगोल दुर्बीणनिर्मिती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून योगेश्वरी शिक्षण संस्थेचे पदाधिकारी प्रा. एस.एस. देशमुख, प्रा. भीमाशंकर शेटे, एस.के. बेलुर्गीकर,
यशोदा राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी प्रणिता कापसे, पठाण, मुख्याध्यापिका वर्षा चौधरी, अलका साळुंके, मुख्य मार्गदर्शक हेमंत धानोरकर, एस.के. निर्मळे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी गणपत व्यास होते.
यावेळी प्रा. एस.एस. देशमुख, प्रणिता कापसे, गणपत व्यास यांनी मनोगत व्यक्त केले. गटशिक्षणाधिकारी प्रा. चंदन कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पवार यांनी केले. शेवटी
एस.एम. सोनटक्के यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख आर.डी. गिरी, डी.आर. काटे, के.जी. पसारकर, सुंदर नेहरकर, सूर्यकांत टेकाळे, प्रकाश शिंदे, गणेश काळे, उदय स्वामी, गौरव कांबळे, नमित सुराणा, गौरव कांबळे यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेत पंचावन्न शिक्षकांना दुर्बीणनिर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. दुर्बिणीतून आकाशातील गृह व
तारे दाखविण्यात आले. खगोलतज्ज्ञ हेमंत भालेराव यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.