अंबाजोगाई : येथील नगरपालिका क्षेत्रात बसव ब्रिगेडच्यावतीने सामाजिक बांधिलकीतून शहरातील यावर्षीची पहिली पाणपोई सुरू करण्यात आली आहे. बसव ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याचा वसा घेत बसव ब्रिगेडचे मराठवाडा अध्यक्ष विनोद पोखरकर यांनी उन्हाळ्याची चाहुल लागताच यावर्षी अंबाजोगाईतील पहिली पाणपोई सुरू केली आहे.
अंबाजोगाईतील नागरिकांना, बाहेरगावच्या प्रवाशांना पिण्याच्या थंड पाण्याची सोय व्हावी व पाण्यासाठी इतरत्र फिरावे लागू नये, या उदात्त विचाराने नगरपालिका क्षेत्रात पाणपोई सुरू केली. या पाणपोईच्या उद्घाटनप्रसंगी विनोद पोखरकर म्हणाले की, अविनाश भोसीकर यांच्या प्रेरणेतून सामाजिक कार्याचा वसा मी घेतलेला आहे. माझी बसव ब्रिगेडच्या मराठवाडा अध्यक्षपदी अविनाश भोसीकर यांनी निवड केली आणि मला मराठवाड्यात काम करण्याची संधी दिली. यामुळे मी त्यांच्या आदेशानुसार काम करत आहे व पुढेही करणार आहे.
यापूर्वी अंबाजोगाईत विनोद पोखरकर यांच्या पुढाकारातून महात्मा बसवेश्वर सार्वजनिक जयंती उत्सव सुरू करण्यात आला. याचधर्तीवर अंबाजोगाई व केज तालुक्यातील १४ गावांमध्ये जयंती उत्सव सुरू झाला. मराठवाड्यातील सर्वात मोठा २५० सदस्य असलेला पुरूष बचतगट विनोद पोखरकर व मित्रपरिवाराने सुरू केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रमाकांत पाटील, अभिजीत गाठाळ, रवी मठपती, रणजित डांगे, राम जोशी यांच्यासह शहरात पिण्याचे थंड पाणी पुरविणारे युनियनचे सदस्य, शहर व परिसरातील लिंगायत समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुरज आकुसकर, प्रसाद कोठाळे, मनोजकुमार बरदाळे, काशिनाथ तोडकर, गणेश रूद्राक्ष, सचिन गौरशेटे, अमोल व्यवहारे, शिवहार राऊत, सचिन गाढवे, धनंजय महाजन, योगेश पोखरकर यांनी पुढाकार घेतला.