लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परळी व अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यामध्ये दोषी असलेल्या २४ अधिकारी आणि १३७ मजूर संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु या कार्यकाळात वरिष्ठ पदावर विराजमान असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या आदेशावरुन समिती स्थापन करण्यात आली आहे.जलयुक्त शिवार योजनेमध्ये झालेल्या घोटाळ्यात आतापर्यंत शासनाकडून मजूर संस्था व काही अधिकाºयांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र या घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन आणखी वरिष्ठ अधिकारी यामध्ये दोषी आहेत का, या चौकशीसाठी चार सदस्यीय समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीमध्ये अपर जिल्हाधिकारी बी.एम. कांबळे, जिल्हा कृषी अधीक्षक मारुती चपळे, जलसंधारणचे कार्यकारी अभियंता गालफाडे व जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे घोटाळा झालेल्या कार्यकाळामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक असणारे रमेश भताने यांची चौकशी होणार असल्याचे समजते. जलयुक्त शिवारच्या कामानंतर ३०९ जलयुक्तच्या कामांची तपासणी केली. त्यापैकी ३०४ कामांमध्ये अनियमितता असल्याचे आढळून आले होते. यावेळी सोयीनुसार अधिकाºयांच्या बदल्या करुन भताने यांनी मनमानी कारभार केल्याचा आरोप काँग्रेस नेते वसंत मुंडे यांनी केला होता.या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या दक्षता पथकाने या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा ठपका ठेवला होता. मात्र तरी देखील कृषी अधीक्षकपदावर असलेल्या रमेश भताने यांची चौकशी देखील करण्यात आली नव्हती. भताने सध्या लातूर येथे कृषी सहसंचालकपदावर आहेत.दोन अधिकारी आहेत चर्चेतजिल्हाधिकाºयांनी गठीत केलेल्या चौकशी समितीकडून तत्कालीन जिल्हा कृषी अधीक्षक रमेश भताने व प्रभारी कृषी अधीक्षक विष्णू मिसाळ यांना चौकशीस सामोरे जावे लागणार आहे. या चौकशीत काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
परळी, अंबाजोगाईतील जलयुक्त घोटाळ्यातील चौकशीसाठी समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:24 AM
लोकमत न्यूज नेटवर्कबीड : परळी व अंबाजोगाई तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार घोटाळ्यामध्ये दोषी असलेल्या २४ अधिकारी आणि १३७ मजूर संस्थांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु या कार्यकाळात वरिष्ठ पदावर विराजमान असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या आदेशावरुन समिती स्थापन करण्यात आली आहे.जलयुक्त शिवार योजनेमध्ये झालेल्या घोटाळ्यात आतापर्यंत शासनाकडून मजूर संस्था ...
ठळक मुद्देकृषी आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश; सर्व दोषींवर होणार कारवाई