वडवणी :
तालुक्यातील दिवसेंदिवस वाढलेला कोरोनाचा कहर लक्षात घेऊन प्रशासनाने कठोरपणे पाऊले उचलली असून उपकेंद्र ठिकाणी ॲन्टीजन तपासणी होणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य तालुका आरोग्य अधिकारी डाॅ एम बी घुबडे यांनी तालुक्यातील अकरा समुदाय आरोग्य अधिकारी यांना दिले असून ग्रामीण भागातील कोरोना रोखण्यासाठी समुदाय आरोग्य अधिकारी सज्ज झाले आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वडवणी येथे गुरुवार रोजी समुदाय आरोग्य अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ बाळासाहेब तांदळे, डाॅ अरुण मोराळे उपस्थित होते. तालुक्यात साळीबा, कवडगाव, देवडी,परडी, चिंचाळा, चिखलबीड, देवळा, उपळी, कोठारबण, काडीवडगाव या उपकेंद्र ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत आहेत. ग्रामीण भागात गावातच आरोग्य सुविधा प्राथमिक उपचारासाठी समुदाय आरोग्य अधिकारी यांची निवड करण्यात आली असून आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून उपकेंद्र ठिकाणी ॲन्टीजन तपासणी होणार आहेत. तसेच पंचेचाळीस वर्षे वरील नागरिकांना कोवीड लसीकरण करण्यात येत आहे. त्याच बरोबर गरोदर महिलांची आरोग्य तपासणी, एच बी तपासणी, शुगर तपासणी, गुप्त रोग तपासणी किट वाटप करण्यात आले.
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डाॅ एम बी घुबडे म्हणाले की तालुक्यातील चार उपकेंद्रात लसीकरण सुरू देवडी उपकेंद्र अंतर्गत आजपर्यंत १६०, कवडगाव ५६, उपळी १५१, देवळा १३७ लाभार्थी यांना लसीकरण करण्यात आले आहे. या चार उपकेंद्रात पंचेचाळीस वर्षेवरील नागरिकांना कोवीड लसीकरण सुरू करण्यात आले असून याचा ग्रामीण भागातील नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॅ एम बी घुबडे यांनी केले आहे.
===Photopath===
150421\20210415_172317_14.jpg