शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

मराठीचा पेपर फोडणाऱ्या ‘त्या’ शिक्षकावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:16 AM

दहावीची परीक्षा सुरु असतानाच अवघ्या दिड तासात व्हॉट्सअ‍ॅपवर मराठीचा पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

अंबाजोगाई / धारुर : दहावीची परीक्षा सुरु असतानाच अवघ्या दिड तासात व्हॉट्सअ‍ॅपवर मराठीचा पेपर फोडणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील शिक्षकावर धारुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.पांडुरंग गणपत मेकुंडे (रा. मोरेवाडी, ता. अंबाजोगाई) असे त्या शिक्षकाचे नाव आहे. मेकुंडे भावठाणा येथील साने गुरूजी विद्यालयात सहशिक्षक आहे. शुक्रवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर होता. या परीक्षेसाठी मेकुंडे आडस येथील केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त होता. परीक्षा सुरु झाल्यापासून अवघ्या दीड तासात मेकुंडे याने मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फोडून ती ‘जिजामाता अंबाजोगाई टीचर्स’ या शिक्षकांच्या ग्रुपवर टाकली. ग्रुपवर प्रश्नपत्रिका पाहताच अनेक सजग शिक्षकांनी याचा निषेध करत त्या शिक्षकाला खडसावले. विशेष म्हणजे अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे देखील या ग्रुपचे सदस्य आहेत. ओरड होऊ लागल्यानंतर त्यांनी या प्रकाराबाबत वरिष्ठांना कळविले. बोर्डालाही हा प्रकार कळवण्यात आला होता.शनिवारी रात्री उशीरा या प्रकरणात अंबाजोगाईचे गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांच्या फिर्यादीवरुन पांडुरंग मेकुंडे विरोधात धारुर पोलिस ठाण्यात कलम ५, (१) (२) ६ महाराष्ट्र विद्यापीठ/बोर्ड व इतर विनिर्दिष्ट परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंध करण्याचा कायदा १९८२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तत्पूर्वी दुपारपासून शिक्षण विभागाचे अधिकारी धारुर ठाण्यात तक्रार देण्यासाठी बसून होते.संस्थेने दिला २४ तासांचा अल्टीमेटममेकुंडे याच्या निलंबनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर संस्थाचालकांनी तातडीची बैठक बोलावली. बैठकीत ठरल्यानुसार मेकुंडे याला आपले म्हणणे मांडण्यासाठी २४ तासांचा अवधी देण्यात आला आहे. त्यांनतर रविवारी सायंकाळी बैठक होऊन अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.मेकुंडे सरपंच पतीगुन्हा नोंद करण्यात आलेल्या शिक्षकाची पत्नी ही अंबाजोगाई शहराजवळ असलेल्या मोरेवाडी गावची सरपंच आहे. मेकुंडेने आपल्या एका नातेवाईकासाठी हा पेपर फोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :BeedबीडEducation Sectorशिक्षण क्षेत्रexamपरीक्षाTeacherशिक्षकCrime Newsगुन्हेगारी