भारत बंदला बीड जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 11:54 PM2018-09-10T23:54:03+5:302018-09-10T23:54:03+5:30
बीड : इंधन दरवाढीचा भडका आणि वाढती महागाईच्या प्रश्नावर कॉँग्रेस व मित्रपक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. बीडमध्ये कॉँग्रेस, राष्टÑवादी कॉँग्रेस, मनसे, समाजवादी पार्टी, राष्टÑीय जनता दल, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लोकतांत्रिक जनता दल आदी मित्रपक्षांनी बंदचे आवाहन केले होते. गणेशोत्सव आणि गौरी गणपती सणामुळे बाजारपेठेत वर्दळ होती. अनेक प्रतिष्ठाने, शाळा, महाविद्यालये बंद होती.
बंद आयोजकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आ. सिराजोद्दीन देशमुख, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, दादासाहेब मुंडे, अशोक हिंगे, प्रा. सर्जेराव काळे, श्रीराम बादाडे, कुंदाताई काळे, गंगाधर घुमरे, कुलदीप करपे, बाळासाहेब घुमरे, शिवाजी कांबळे, राहुल साळवे, महादेव धांडे, शैलेश जाधव, फरीद देशमुख, योगेश शेळके, संतोष निकाळजे, दत्ता प्रभाळे, नगरसेवक डॉ. इद्रीस हाश्मी, नागेश मीठे, राणा चव्हाण, संभाजी जाधव आदी उपस्थित होते. दरम्यान इंधन दरवाढ त्वरीत कमी करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नामदेव चव्हाण, एस. वाय. कुलकर्णी, ज्योतीराम हुरकुडे, भाऊराव प्रभाळे, शेख इब्राहिम, भीमराव, महादेव नागरगोजे, सुनील भोसले, विनोद सवासे, गोविंद साळवे आदींनी निवेदनाद्वारे केली. जिल्ह्यात शिरूर येथे आठवडी बाजार भरला होता.
नेकनुरात सरकारचा निषेध
नेकनूर : येथे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या वतीने निषेध करीत केंद्र व राज्य शासनाविरोधात प्रचंड घोषणाबाजी झाली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद साजेद अली, माजी सरपंच आजम पाशा, ग्रा. पं. सदस्य सय्यद खालेद, इजहारोदीन जहागीरदार, सतीश मुळे, दादाराव जाधव, हामेद सलीम, शेख मसीयोद्दीन, हाश्मी अ. हाई, बिभीषण नन्नवरे, शेख मुजम्मील, कल्याण कानडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजलगावात बंदला प्रतिसाद
भारत बंदच्या आवाहनाला सोमवारी माजलगावात चांगला प्रतिसाद मिळाला. कॉँग्रेससह समविचारी पक्षांचे नेते बंदचे आवाहन करत रस्त्यावर उतरले होते. काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये नारायण होके, कॉ. अॅड. नारायण गोले, कॉ.बाबा मुस्तुकीद्दीन, हरिभाऊ सोळंके, मनोहर डाके, शेख रशीद, अॅड.इनामदार, शेख अहेमद, विशंभर थावरे, शबीर पठाण, विनोद सुरवसे, गणेश चोरमले, यासह अनेक पदाधिकाºयांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रॅलीमध्ये सामान्य नागरिकही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तहसीलदार एन. जी. झम्पलवाड यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
अंबाजोगाईत दुचाकी ढकल मोर्चा
अंबाजोगाई : महागाईविरोधात पुकारलेल्या भारत बंदला तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळाला. शहरातील सावरकर चौकातून दुचाकी ढकल मोर्चा काढण्यात आला.
शासनाने डिझेल व पेट्रोल वरील प्रति लिटर अंदाजे चाळीस रुपये एवढा कर टॅक्स तात्काळ रद्द करावा नसता तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ.पृथ्वीराज साठे, संजयभाऊ दौंड, कॉ. बब्रुवाहन पोटभरे, बबनराव लोमटे,मधुकर काचगुंडे, गोविंदराव देशमुख, अमर देशमुख, मिनाताई शिवहर भताने, तानाजी देशमुख, औदुंबर मोरे, महादेव आदमाने, रणजित लोमटे, मनोज लखेरा, अॅड. अजय बुरांडे, अॅड. शिवाजी कांबळे आदींनी दिला.
बंदमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा, शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (प्रा. जोगेंद्र कवाडे गट), भाकपा, कम्युनिस्ट पार्टी, मार्क्सवादी पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, लोकतांत्रिक जनता दल, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड आदी सहभागी झाले होते. बंदला जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष इमरान पठाण, जिल्हा संघटक शेख फिरोजभाई, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष विनोद सिरसाट यांनी पाठिंबा दिला.
केजकरांचा बंदला ठेंगा
केज : राष्ट्रीय काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणी सदस्या माजी खासदार रजनी पाटील यांचे गाव असलेल्या केजमध्ये भारत बंदच्या आवाहनाकडे व्यावसायिकांसह नागरीकांनी पाठ फिरवल्याने शहरातील व्यवहार सुरळीत सुरू होते. आंदोलनाचा फज्जा उडाल्याने शहरात चवीने चर्चा केली जात होती. शहरातील शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयाचे कामकाज सुरळीत चालू होते. छत्रपती शिवाजी महाराज चौकात नंदकिशोर मुंदडा, पशूपतीनाथ दांगट, सुमंत धस, मोहन गुंड, राहुल सोनवणे, शारदा गुंड, कविता कराड, समीर देशपांडे, अमर पाटील, कबीरोद्दीन इनामदार, राहुल गवळे, लिंबराज फरके, प्रकाश राऊत, नेताजी शिंदे, मुकुंद कणसे, अतुल इंगळे, सुनिल घोळवे आदींनी अर्धातास रास्ता रोको आंदोलन केले. तहसीलदार संजय वारकड यांना निवेदन दिले.
आष्टीत कडकडीत बंद
आष्टी तालुक्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाळासाहेब आजबे, अण्णासाहेब चौधरी, अॅड. विनोद निंबाळकर,डॉ. शिवाजी राऊत,काकासाहेब शिंदे, गनी शेख, काँग्रेसच्या मिनाक्षी पांडुळे, अॅड. बी. एस. लटपटे, अॅड. गोरख आंधळे, वसंत धोडे, जगन्नाथ ढोबळे, संदिप अस्वर तसेच पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले.
धारूरमध्ये प्रशासनाला दिले निवेदन
धारूर : येथे काँग्रेसतर्फे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी रा. कॉ.पार्टी, मनसे, माकप यांनी जाहीर पाठीबा दिला. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष अजय सिंह दिख्खत, युवक तालुकाध्यक्ष अशोक तिडके, महिला आघाडीच्या तालुका सुरेखा सोळंके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ईश्वर मुंडे, म.न.से तालुकाध्यक्ष विठ्ठल दादा, माकपचे तालुकाध्यक्ष डॉ. थोरात, शिनगारे, शहराध्यक्ष बाबूराव सोनाजी शिनगारे, भागवत गव्हाणे व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.