शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

राष्ट्रवादीत अध्यक्षपदाचा गोंधळ, परळीत अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 6:44 PM

अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार धनंजय मुंडे यांच्या परळीत असे बॅनर लागल्याने चर्चेला उधाण

परळी (बीड) : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सोडल्याचे काल जाहीर केल्याने पक्षात गोंधळाचे वातावरण आहे. सर्वसामान्य कार्यकर्ता ते पदाधिकारी संभ्रावस्थेत असताना परळीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाने 'भावी मुख्यमंत्री अजित पवार' असे बॅनर लावल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदाची चर्चा चालू असताना  परळीत विविध भागांत 'भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार' असा उल्लेख असलेले बॅनर मंगळवारी रात्री लावण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष जाबेरखान पठाण यांनी मंगळवारी (दि. 2 ) रात्री हे बॅनर लावल्याची माहिती आहे.  

'भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार' असा उल्लेख असलेल्या या बॅनरवर  राष्ट्रवादीचे शरद पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, वाल्मीक कराड यांचे फोटो आहेत. हे बॅनर आज सकाळी निदर्शनास  आले. अजित पवार यांचे निकटवर्तीय आमदार धनंजय मुंडे यांच्या शहरात असे बॅनर लागल्याने राजकीय गोटात विविध अंदाज बंधने सुरु झाले. दरम्यान, हे बॅनर आज सकाळी हटविण्यात आले. 

शहरात मंगळवारी रात्री 8.30 वाजता बॅनर लावले होते. मात्र, आज सकाळी वरिष्ठांच्या सूचनेनुसार बॅनर काढले आहेत - जाबेर खान पठाण, माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, परळी

टॅग्स :BeedबीडAjit Pawarअजित पवारDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस