केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. महागाई प्रचंड प्रमाणावर वाढली आहे. महागाईने जनतेचे जगणे मुश्किल व असह्य झाले आहे, असे निवेदनात म्हटले आहे. महागाई विरोधात शनिवारी सकाळी बीड शहरामधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून, बस स्टॅंड, अण्णाभाऊ साठे पुतळा, सुभाष रोड, भाजी मंडई, बशीर गंजमार्गे ही रॅली काढण्यात आली. यावेळी प्रमुख चौकाचौकात मोदी सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनामध्ये बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी, जिल्हा प्रभारी सत्संग मुंडे, ॲड. कृष्णा पंडित, तालुका अध्यक्ष महादेव धांडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. राहुल साळवे, शहराध्यक्ष डॉ. इद्रीस हशमी, सेवादल जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, वच्छिष्ट बडे, अरुण कांबळे, राणा चव्हाण, गोविंद साठे, जयप्रकाश आघाव, गणेश राऊत, परवेज कुरेशी, चरण सिंग ठाकूर, नितीन वाघमारे आदी काँग्रेस पदाधिकारी बहुसंख्येने हजर होते.
100721\10bed_2_10072021_14.jpg
सायकल रॅली