महागाईविरोधात बीडमध्ये काँग्रेसचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 11:50 PM2018-04-09T23:50:55+5:302018-04-09T23:50:55+5:30
बीड जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईसह इतर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी माजी खा. रजनी पाटील, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महागाईसह इतर विविध मागण्यांसाठी एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी माजी खा. रजनी पाटील, जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
भाजप सरकार हे हूकमशाही पद्धतीचा अवलंब करत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे. तसेच आज बेरोजगारीचा प्रश्न तरूणांसमोर उभा आहे. जागतिक बाजार पेठेत कच्च्या तेलाच्या किंमती कमी असताना देखील शासनाने पेट्रोल व डिझेल वर अधिक कर लाऊन सामान्य नागरिकांची लूट केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे, राज्यात दलित, आदिवासी, यांच्यावर होणारा अत्याचार व अन्याय रोखावा, राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वाढती बेरोजगारी यावर उपाययोजना कराव्या व रोजगारांच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, या मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार केला नाही तर पुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही त्यांनी दिला.