अंबाजोगाई :
पेट्रोल, डिझेल आणि घरगुती वापराच्या गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसतर्फे अंबाजोगाई येथे सोमवारी सकाळी ११ वाजता रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सोमवारी बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत पेट्रोल पंपांवर भाववाढीच्या निषेधाचे फलक झळकावून आणि काळे झेंडे दाखवून आंदोलन केले. अंबाजोगाई येथे आंदोलनाचे नेतृत्व बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केले. केंद्रातील भाजपाच्या मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व घरगुती वापराच्या एलपीजी गॅसच्या किमती या भरमसाठ वाढवल्या आहेत. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे. त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत. मोदी सरकारच्या या अन्यायी दरवाढीविरोधात हे आंदोलन केले.
आंदोलनात अॅड. विष्णुपंत सोळंके, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पोतंगले, अंबाजोगाई शहराध्यक्ष महादेव आदमाने, नगरसेवक मनोज लखेरा, सुनील व्यवहारे, राणा चव्हाण, माणिक वडवणकर, सज्जन गाठाळ, गणेश मसने, सुनील वाघाळकर, पांडुरंग देशमुख, भारत जोगदंड, दिनेश घोडके, अकबर पठाण, अजीम जरगर, रफिक गवळी, अनिस पठाण, मुख्तार शेख, खलील शेख, रमेश कदम, अशोक देवकर, सचिन जाधव, अमोल मिसाळ, महेश वेदपाठक आदींसह काँग्रेस पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.
===Photopath===
080621\avinash mudegaonkar_img-20210607-wa0066_14.jpg