लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : पूर्वीच्या काळी दगडी बारव बांधून त्यात पाण्याची साठवणूक होत असे. आजही या बारवांच्या बांधकामाकडे आकर्षण, उत्कृष्ट प्राचीन कलेचा नमुना म्हणून पाहिले जाते. काळाच्या ओघात ही बारवे नामशेष होत चालली आहेत. परंतु कडा शहरात या बारवांचे आजही जतन केले जात आहे. याकडे मात्र पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
प्राचीन काळातील लोकांनी गावातील वाटसरू व देवस्थानाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून दगडी बांधकाम करून बारवं बांधली होती. पण हळूहळू याकडे दुर्लक्ष होऊ लागले. पाण्याचे स्रोत व इतर विद्युत पंपाच्या निर्मिती झाल्याने लोकांचे याकडे दुर्लक्ष झाले. ही मनमोहक बारवं कालबाह्य झाली. कडा शहरात तीन ठिकाणी ही दगडी बारवं होती. यातील दोन कालबाह्य झाली. तर श्रीराम मंदिरालगतच असलेले एकच बारव चांगल्या अवस्थेत आहे. यासाठी शहरातील लोकसहभागातून याची स्वच्छता करून त्याचे संवर्धन करण्यात आले आहे. आजही इथे पाहिले तर जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याशिवाय राहत नाही. पण पुरातत्व विभागाने दुर्लक्ष केल्याने जुने, प्राचीन काळातील वास्तू नामशेष होऊ लागल्या आहेत. प्राचीन काळातील वास्तूंचे संवर्धन व जोपासना करण्यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.
कड्यातील बारवाला तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी भेट दिली होती. प्राचीन काळातील वास्तू जोपासलेल्या बारवांची पाहणी करून तिचे संवर्धन केल्यामुळे कडा शहरवासीयांचे त्यांनी कौतुकही केले होते.
....
प्राचीन काळातील लोकांनी ही बारवं बांधली होते. काळाच्या ओघात ते बारवं बुजले आहेत. तरी देखील लोकसहभागातून ग्रामस्थांनी येथील एका बारवाचे संवर्धन केले आहे. अनेक बारवे नामशेष होत असल्याने पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
- शंकर देशमुख, सामाजिक कार्यकर्ते, कडा.
...
120921\nitin kmble_img-20210912-wa0016_14.jpg
कडा शहरातील राम मंदिराजवळील पुरातन बारवाचे संवंर्धन केले जाते. त्याची पाहणी तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील केंदेकर यांंनी केली होती.