शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

मतदार संघ एक अन् दावेदार अनेक; बीड जिल्ह्यातून विधानसभेसाठी कोणाला मिळणार उमेदवारी?

By सोमनाथ खताळ | Published: July 29, 2024 12:14 PM

पक्षश्रेष्ठींपुढे पेच : धनंजय मुंडेंच्या विधानामुळे काही इच्छुकांमध्ये अस्वस्थता

बीड : आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी एका मतदारसंघातून अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे यातून कोणाला उमेदवारी द्यायची, असा पेच पक्षश्रेष्ठींसमोर असणार आहे. मागील आठवड्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिथे ज्या पक्षाचा आमदार ती जागा त्याच पक्षाची असे विधान केल्याने काही इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. असे असले तरी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा विश्वास व्यक्त करत भावी आमदार गाठीभेटी, दौरे करताना दिसत आहेत. ही परिस्थिती कोणाएका मतदारसंघाची नसून जिल्ह्यातील सहाही ठिकाणची आहे.

राज्यातील राजकीय घडामोडी झाल्यानंतर बीड लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. यावेळी युतीकडे आमदार, खासदार असतानाही केवळ जातीय राजकारण झाल्याने त्यांना फटका बसला. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे विजयी झाल्याने या पक्षातील लोकांचा विश्वास वाढला आहे. आता आगामी विधानसभा निवडणूक अनुषंगाने हे दोन्ही गट कामाला लागले आहेत. आपल्या मतदारसंघात आपलीच ताकद जास्त आहे, आपलीच लोकप्रियता आहे, असे दाखविण्यासह गाठीभेटी घेण्यात सर्वच इच्छुक व्यस्त आहेत. असे असले तरी ही गर्दी पाहून पक्षश्रेष्ठी नेमकी उमेदवारी कोणाला देणार? हे वेळेनुसार समजणारच आहे.

माझीही उमेदवारी जाहीर नाही - धनंजय मुंडेबीड शहरात धनंजय मुंडे यांच्या उपस्थिती पदाधिकारी, कार्यकर्ता मेळावा मागील आठवड्यात झाला. यामध्ये त्यांनी जिथे ज्या पक्षाचा आमदार, ती जागा त्याच पक्षाची असे सुनिश्चित झाले आहे. त्यामुळे उर्वरित जागांची वाटाघाटी होईल. अद्याप माझीही परळीची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे योग्य वेळेला योग्य उमेदवाराची घोषणा होईल, असे सांगितले. यामुळे जेथे भाजप आमदार आहेत, तेथील राष्ट्रवादीचे आणि जेथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तेथील भाजपचे इच्छुक अस्वस्थ आहे.

शिंदे गटाचा केवळ बीडवर दावा२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी एक असताना सहाही ठिकाणी त्यांचे उमेदवार दिले होते. त्यातील आष्टी, माजलगाव, परळी आणि बीडमध्ये विजय झाला होता. तर केज आणि गेवराईत पराभव झाला होता. युतीकडून बीडवगळता पाच ठिकाणी उमेदवार होते. त्यातील गेवराई आणि केजमध्ये विजय झाला होता. शिवसेनेचा बीडमध्ये पराभव झाला होता. युती असताना बीड मतदारसंघावर कायम शिवसेनेने दावा केलेला आहे. यावेळीही युतीकडून शिवसेना शिंदे गट दावा करत आहे. तर आघाडीकडूनही ठाकरे गट दावा करताना दिसत आहे. परंतु येथे आगोदरच राष्ट्र्वादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे नेमकी जागा कोणाला मिळणार? याकडे लक्ष लागले आहे.

जयंत पाटील यांचेही सूचक वक्तव्यलोकसभा निवडणुकीत ज्या पक्षांचे जिथे खासदार होते, तेथे त्यांना प्राधान्य देण्यात आले. आता विधानसभासंदर्भात असे काही ठरले नाही. परंतु तीच लाइन पकडू, असे सूचक विधान करत त्यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचाच उमेदवार असेल, असे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. इतर मतदारसंघात मात्र त्यांना नव्याने उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे.

काेणत्या मतदारसंघातून कोण इच्छुकबीडभाजप - राजेंद्र मस्केशिवसेना शिंदे गट - अनिल जगतापराष्ट्रवादी अजित पवार गट - डॉ. योगेश क्षीरसागर, बळीराम गवतेशिवसेना ठाकरे गट - परमेश्वर सातपुते, गणेश वरेकरराष्ट्रवादी शरद पवार गट - संदीप क्षीरसागरइतर- डॉ. ज्योती मेटे, जयदत्त क्षीरसागर, सुरेश नवले, सीए बी. बी. जाधव, कुंडलिक खांडे

माजलगावभाजप - रमेश आडसकर, मोहन जगताप, नितीन नाईकनवरे, बाबरी मुंडेशिवसेना शिंदे गट - तुकाराम येवलेराष्ट्रवादी अजित पवार गट - प्रकाश सोळंके, जयसिंह सोळंके, अशोक डकराष्ट्रवादी शरद पवार गट - मनोहर डाके, चंद्रकांत शेजूळ, नारायण डक, राधाकृष्ण होके पाटील, सहाल चाऊस, शेख मंजूरइतर - माधव निर्मळ, ओमप्रकाश शेटे, अप्पासाहेब जाधवशिवसेना ठाकरे गटाचे सध्यातरी कोणी नाही

केजभाजप - नमिता मुंदडा, संगीता ठोंबरेशिवसेना शिंदे गट - डॉ. अंजली घाडगेशिवसेना ठाकरे गट - डॉ. नैना सिरसाटराष्ट्रवादी शरद पवार गट - पृथ्वीराज साठे, नवनाथ शिंदेइतर - डॉ. राहुल शिंदे, अशोक वाघमारे, रमेश गालफाडे,राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सध्यातरी कोणी नाही.

आष्टीभाजप - सुरेश धस, भीमराव धोंडे,राष्ट्रवादी अजित पवार गट -बाळासाहेब आजबे, सतीश शिंदेराष्ट्रवादी शरद पवार गट - राम खाडे, साहेबराव दरेकरइतर - अण्णा चौधरी, अमोल तरटे, किशोर हंबरडे, एन. एल. जाधवशिंदे गट व ठाकरे गटाचे सध्यातरी कोणी नाही.

गेवराईभाजप - लक्ष्मण पवारराष्ट्रवादी अजित पवार गट - विजयसिंह पंडितशिवसेना ठाकरे गट - बदामराव पंडितशिंदे गट, शरद पवार गट यांच्यासह अपक्ष दावेदार सध्यातरी नाही.

परळीराष्ट्रवादी अजित पवार गट - धनंजय मुंडेराष्ट्रवादी शरद पवार गट - राजेभाऊ फड, ॲड. माधव जाधव, फुलचंद कराड, सुदामती गुट्टे,काँग्रेस - राजेसाहेब देशमुखइतर - प्रा. टी. पी. मुंडेभाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट सध्या तरी कोणी नाही.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Beedबीड